लिंगायत माळी समाजाचे पुरस्कार जाहीर  शंकरराव माळी समाज रत्न, कांता माळी यांना आदर्श माता पुरस्कार  पट्टणकोडोलीच्या सी.एम. माळी यांच्या कुटुंबाला आदर्श कुटुंब पुरस्कार

कोल्हापूर :लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा समाज रत्न पुरस्कार प्रा. शंकरराव माळी-यादव तर आदर्श माता पुरस्कार श्रीमती कांता दिनकर माळी यांना जाहीर करण्यात आला आहे. आदर्श कुटुंब पुरस्कार पट्टणकोडोली येथील उद्योजक सी.एम. माळी यांच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवार दि. 13 जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापुरातील बिंदू चौक येथील अक्क महादेवी मंडप येथे करण्यात येणार आहे.

 

 

 

 

लिंगायत माळी समाजाच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्काराचे वितरण केले जाते. यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्याचे वितरण विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

 

याचबरोबर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. समाजातील गुणी आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याचा उपक्रम ही यावेळी राबविण्यात येणार आहे. समाजासाठी अनेक वर्षे निस्वार्थपणे कार्यरत असणाऱ्या काही व्यक्तींचा कृतज्ञता गौरव सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

🤙 8080365706