पंचगंगा व भोगावती नद्यांच्या तीरावर उपसाबंदी

कोल्हापूर: पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील नमूद भागात रब्बी हंगाम 2026-27 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणा-या उपसा यंत्रावर कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 कलम 51 (3) व 97 मधील तरतूदीनुसार असलेल्या अधिकारान्वये उपसाबंदी जाहीर केली आहे.

 

 

 

 

 

भोगावती नदी कार्यवाहीचा भाग- राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंच्या भोगावती नदीवरील दोन्ही तीरावरील भाग व कासारी नदीवरील यवलूज को.प. बंधाऱ्याच्या खाली ते शिंगणापूर को.प. बंधाऱ्यापंर्यंत दोन्ही तीरावर व कुंभी नदीवरील सांगरुळ को.प. बंधाऱ्याच्या खालील बांजू कुंभी व भोगावती नदीपर्यंतच्या संगमांपर्यंत दोन्हा तीरावर वर नमूद केलेल्या नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तीरावरील भागात 6 ते 7 जून या दोन दिवसांच्या कालावधीत शेतीसाठी वापरल्या जाणा-या उपसा यंत्रासाठी उपसाबंदी केली आहे.

 

पंचगंगा नदी कार्यवाहीचा भाग-पंचगंगा नदीवरील शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याखाली ते रुई कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंत दोन्ही तिरावरील भाग वर नमूद केलेल्या नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तिरावरील भागात 8 ते 9 जून या कालावधीत शेतीसाठी वापरल्या जाणा-या उपसा यंत्रासाठी उपसाबंदी केली आहे.

 

उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसायंत्र जप्त करून परवाना धारकाचा उपसा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणा-या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही.

0000

🤙 8080365706