कोल्हापूर:जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आज आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया *समुपदेशन पद्धतीने* यशस्वीरित्या पार पडली.

जि.प. अध्यक्षा *मा. सौ. शिल्पा खोत* व उपाध्यक्ष *मा. तानाजी पाटील* यांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्य व बांधकाम समिती सभापती *मा. सौ. सारिका नांदेकर*, मुख्य कार्यकारी अधिकारी *डॉ. जॅसमिन*, उपमुख्य कार्यकारी अधिकारी *मा. ओमप्रकाश यादव* व जिल्हा आरोग्य अधिकारी *डॉ. अनिरुद्ध पिंपळे* यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण झाली.
*पदोन्नती मिळालेले कर्मचारी:*
– *आरोग्य पर्यवेक्षक (महिला): 05*
– *आरोग्य सहाय्यक (महिला): 11*
– *आरोग्य सहाय्यक (पुरुष): 07*
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या सूचनेनुसार सर्व पदोन्नती *पारदर्शक व समुपदेशन पद्धतीने* करण्यात आल्या. पदोन्नतीमुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण होते.
यावेळी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, संघटना प्रतिनिधी, उपस्थित होते. समुपदेशन पद्धतीने प्रक्रिया राबवल्याबद्दल कर्मचारी संघटना व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करून प्रशासनाचे आभार मानले.
