महिन्यापूर्वी सुनावणी झालेल्या दूध संस्थांचे निकाल द्या             गडहिंग्लज तालुक्यातील संस्थांची मागणी            निकालाला विलंब हा सुद्धा अन्यायच             

कोल्हापूर:गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील दूध संस्थांना अंतरीम अवसयानाचे आदेश मिळाले होते. त्याबाबतची सुनावणी महिन्याभरापूर्वी झाली. परंतु; अद्यापही या सुनावणीचे निकाल मिळालेले नाहीत. या दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी सुनावणीचे निकाल आजच्या आज द्या, अशी आग्रही माहिती सहाय्यक दुग्ध निबंधकांकडे केली.

 

 

 

 

सुनावणी झालेल्या दूध संस्थांच्यावतीने सहाय्यक निबंधक- दुग्ध यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आम्हा अंतरिम अवसायांनाची नोटीस मिळालेल्या सर्व संस्थांची सुनावणी गेल्या महिन्यात दि. २४ एप्रिल रोजी म्हणजेच बरोबर एक महिन्यापूर्वी झाली. शासन व दुग्ध विभागाकडून संस्था व शेतकरी हिताचे निर्णय तत्परतेने होणे अपेक्षित असताना निकाल देण्यात होत असलेला अनावश्यक टाळाटाळ व विलंब हा अन्यायकारक, निष्काळजीपणाचा प्रकार असल्याबद्दल संस्थाप्रतिनिधींनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

 

शेतकऱ्यांत असंतोष……!

अधिकाऱ्यांसमोर संस्था प्रतिनिधींनी सुनावणीचे निकाल मिळत नसल्यामुळे येणाऱ्या अडचणींची गा-हाणी मांडली. या विलंबामुळे संस्थांच्या दैनंदिन कामकाजावर गंभीर परिणाम होत असून दूध संस्था, दूध उत्पादक शेतकरी व सभासदांमध्ये मोठया प्रमाणात संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला आहे. अनेक संस्थांची आर्थिक व प्रशासकीय कामे रखडली असून शेतकन्यांना विविध अडचर्णीना सामोरे जावे लागत असल्याकडेही लक्ष वेधले.

 

🤙 8080365706