कोल्हापूर : मंगळवार, दिनांक ०५/०५/२०२६ रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक समिती सभागृहात बांधकाम समितीची महत्त्वाची सभा मा. सभापती (बांधकाम) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रथम सचिव तथा कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांनी मा. सौ. सारिका यशवंत नांदेकर, सभापती, बांधकाम समिती तसचे सर्व जि प सदस्य यांचे स्वागत करुन सभेला सुरुवात केली त्यानंतर बांधकाम समिती सभेस जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेऊन विविध विषयावर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली.

सभेतील प्रमुख घेणेत आलेले विषय 1) जि प कोल्हापूर मालकीच्या खाऊ गल्ली गडहिंग्लज येथील दुकान गाळे क्रं.01 ते 12 फेरनिविदा प्रक्रिया करणे बाबत पुढील कार्यवाहीसाठी सादर करणेबाबत. 2) जि प रस्त्याकडेने / रस्ता क्रॉस करुन ओएफसी केबल टाकणेस परवानगी देणेत अंदाजपत्रकीय तरतुद करुन मिळणे बाबत. 3) सुरक्षा रक्षक टेंडर 4) इलेक्ट्रीफिकेशन जुने वायरिंग बदलणे 60.00 लक्ष 5) र.रु. 50 ते 75 लक्ष मधील कामांच्या निविदा मंजूरी बाबत 6) बांधकाम समिती सभेमध्ये जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत ⅰ) 3054-3021 ग्रामीण रस्ते व ii) 3054-3353 इतर जिल्हा मार्ग रस्ते विकास व मजबुतीकरण करणे प्राधान्यक्रम यादीतील प्रशासकीय मान्यता देणेत आलेल्या कामांची यादीस मान्यता देणेबाबत. 7) वाहन निर्लेखन व लिलाव 8) जि प बांधकाम विभाग कोल्हापूर अंतर्गत विविध योजनांतर्गत मंजूर कामांबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कामांची तपासणी नेमणूक करणेत आलेल्या राज्यगुणवत्ता निरिक्षक ग्रेड-2 यांचेमार्फत करुन प्राप्त अहवालानुसार तक्रारदारास माहिती कळविणेबाबत. 09) स्वच्छता टेंडर 10) जिल्हा परिषद सेस मधील कामांना मान्यता 11) मुख्य प्रशासकीय इमारत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे 120 लिटर क्षमतेचे जलशीतक यंत्र बसविणेकामी शिफारस करणेबाबत. 12) भाऊसिंगजी रोड येथील जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा सि.सं.नं.2111/1 व 2111/2 विकसित करणे. इ. विषयावर चर्चा झाली. तसेच जि.प. चे उत्पन्न वाढवण्यासाठी तालुका स्तरावरील गेस्ट हाऊसची दुरुस्ती करून ते सुस्थितीत आणण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच जि.प. मधील कॅन्टीन पूर्ववत
करण्याबाबतही चर्चा झाली. मा सभापती यानी जिल्हा मध्ये बांधकाम विभागामार्फत होणारी सर्व बांधकामे चांगल्या दर्जाची झाली असे
निर्देश दिले.
सदर सभेला मा. बांधकाम सभापती व बांधकाम समितीचे सदस्य, कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्ह्यातील सर्व उपअभियंता आणि संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
