टाकाळा माळी कॉलनी येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांच्यासोबत केली पाहणी

कोल्हापूर:कोल्हापूर मध्ये एकूण तीन जलतरण तलाव आहेत. अंबाई टॅंक, रमणमळा आणि राजारामपुरी येथील राजश्री छत्रपती शाहू जलतरण तलाव यापैकी फक्त रमणमाळा येथील तलाव सुरळीत सुरू आहे. माळी कॉलनी येथील राजर्षी छत्रपती शाहू जलतरण तलाव 2003 रोजी सुरू झाला यावेळी ऑलिंपिक दर्जाचा तलाव अशी या तलावाची ओळख होती अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी सराव करत होते. 2019 पासून हा आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव बंद आहे. काल 29 एप्रिल रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची भेट घेऊन त्यांना हा जलतरण तलाव बंद असण्याबद्दल माहिती दिली.

 

 

 

आयुक्तांनी आज दिनांक 30 रोजी सकाळी एकत्र हा तलाव पाहणी करण्याचे आश्वासन विजय जाधव यांना दिले. ठरल्याप्रमाणे आज सकाळी आठ वाजता आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड व भाजपा जिल्हाध्यक्ष नगरसेवक विजय जाधव,महापौर रूपाराणी निकम,उपायुक्त, उपशहर अभियंता गुजर साहेब, सुरेश पाटील साहेब यांनी या जलतरण तलावाची नीट पाहणी केली. हा जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी मा. आयुक्त यांनी विजय जाधव यांच्याशी काही उपाय योजना याच्याबद्दल चर्चा केली लवकरात लवकर हा जलतरण तलाव सुरू व्हावा यासाठी लागेल ती मदत महापालिका करेल असे आश्वासन ही दिले.

🤙 8080365706