कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिवस समारंभ 1 मे रोजी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ शुक्रवार, 1 मे रोजी सकाळी 8 वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे.

मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी दि. 1 मे रोजी सकाळी 7.15 ते 9 वाजेपर्यंतच्या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजवंदन समारंभ आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 7.15 च्या पूर्वी किंवा सकाळी 9 वाजल्यानंतर करावा.
या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई वडील यांनी उपस्थित रहावे. समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनीटे अगोदर उपस्थित रहावे. सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणतीही पिशवी सोबत आणू नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले .
00000
