वाठार येथे जीपच्या धडकेत बालक जागीच ठार तर वडीलांचा उपचार दरम्यान मृत्यू

कोल्हापूर:हातकणंगले तालुक्यातील वाठार – वाराणानगर मार्गावरील वाठारजवळ भरधाव जीपने धडक दिल्याने झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीवरील अंबप येथील पाच वर्षांचा धैर्यशील उदय जाधव हा बालक जागीच ठार झाला तर आज उपचारा दरम्यान वडील उदय जाधव यांच्या मृत्यू झाला. हा अपघात रात्री उशिरा झाला. अपघाताची नोंद पेठवडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वाठार – वाराणानगर मार्गावर वाराणानगरहून भरधाव वेगाने आलेल्या जीपने तळसंदे गावच्या वळणावर एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत वाळवा तालुक्यातील कुडत्रे येथीलमोहन बाबासाहेब शेटे व पारगाव येथील माधुरी अनिल बुड्ढे हे दोघे जण जखमी झाले. या दुचाकीला धडक देऊन पुढे जाण्याच्या प्रयत्नात जीपच्या चालकाने गाडी भरधाव वेगाने वाठारच्या दिशेने नेत असताना वाठारजवळील एका बाजूच्या पेट्रोलपंपासमोर या जीपने वाठारकडून येणाऱ्या टायर सुमोला धडक दिली. दरम्यान, काही अंतरावर समोरून येत असलेल्या दुचाकीला धडक देऊन जीप रस्त्याकडेला नाल्यात जाऊन अडकली.
या धडकेत दुचाकीवरील हातकणंगले तालुक्यातील अविनाश उर्फ उदय अशोक जाधव, त्यांची पत्नी प्रियंका, मुलगी कृतिक व मुलगा धैर्यशील हे रस्त्यावर फेकले गेले. यात धैर्यशील जागीच ठार झाला. गंभीर जखमी अवस्थेत उदय, प्रियंका व कृतिक यांना वडगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघातस्थळी दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक राजू साळुंखे यांच्यासह महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे सहज कॅमेरा मन अतुल कसबेकर भेंडवडे

🤙 8080365706