दर्जेदार आणि टिकाऊ कामास प्राधान्य द्या : आमदार राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना;पंचगंगा नदीजवळील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता, विरंगुळा उद्यानास भेट

कोल्हापूर  : पर्यटन विभागाच्या माध्यमातून शहरातील ऐतिहासिक तलावाजवळ हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता, विरंगुळा उद्यान निर्माण करण्यास रु.४ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु, तांत्रिक कारणास्तव सदर प्रकल्पाची जागा बदलून तो पंचगंगा नदी परिसरात नियोजित करण्यात आला.

 

 

 

या उद्यानात नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला असून, या उद्यानात सुमारे ४५० भारतीय आयुर्वेदीक झाडे लावण्यात आली आहेत. हे उद्यान नागरिकांच्या आरोग्य, व्यायाम आणि विरंगुळ्याचा केंद्रबिंदू ठरत असून, शहरातील उद्यानांपैकी सर्वोत्तम उदाहरण ठरेल अशा पद्धतीने या उद्यानाच्या दर्जेदार आणि टिकाऊ कामास प्राधान्य द्या, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटाजवळील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता व विरंगुळा उद्यानास भेट दिली. यावेळी त्यांनी फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासकामांचा आढावा घेऊन महापालिका अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.

ते पुढे म्हणाले कि, पावसाळयामध्ये पुराच्या पाण्याने या उद्यानाचे नुकसान होणार नाही यावी प्राधान्याने खबरदारी घेतली जाणे गरजेचे आहे. पुराच्या पाण्याच्या विनाअडथळा निचरा होण्यासाठी आवश्यक उपायोजना करा. वॉकिंग ट्रॅकचे सपाटीकरण करून नागरिकांना फिरताना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. पहाटे आणि संध्याकाळी फिरणाऱ्या महिला व नागरिकांची संख्या अधिक असल्याने येत्या ४ दिवसात उद्यानात लाईटची व्यवस्था करा. उद्यानात नागरिकांच्या मागणी प्रमाणे अजुनही विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, फुलझाडे आणि वृक्षलागवड करून ते खऱ्या अर्थाने जैवविविधता उद्यान म्हणून विकसित करावे. या भागातील नागरिकांसह येणारे पर्यटकांसाठी हे महत्वाचे विरंगुळा केंद्र असल्याने बैठक व्यवस्था, वॉकिंग ट्रॅक, सरंक्षक भिंत, सुरक्षा गेट तात्काळ निर्माण करा. जनावरांचा नागरिकांना उपद्रव होवू नये यासाठी उपाययोजना करा. सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करा. उद्यानाची स्वच्छता आणि झाडांच्या देखभालीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंचगंगा नदीचा परिसर पर्यटन आणि पर्यावरणदृष्ट्या अधिक समृद्ध होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहरअभियंता फुलारी, प्रकल्प अभियंता सुरेश पाटील, एस.टी.बी.सी.कंपनीचे बबन बाबर, आर्किटेक्ट रणजीत निकम, परिवहन सदस्य रोहन अतिग्रे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, माजी नगरसेवक उदय जगताप, दीपक उर्फ पिंटू काटकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उदय भोसले, अनिल पाटील, संभाजी अतिग्रे, चंद्रकांत शिंदे, कपिल नाळे, विनोद हजारे, विनायक जाधव, अर्जुन अंबी, राकेश पोवार, शुभम माळवी आदी उपस्थित होते.

 

🤙 8080365706