खोची– लोप पावत चाललेल्या पारंपरिक कुस्ती परंपरेला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी खोची ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून, शिकाऊ पैलवानांसाठी विशेष मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत आधुनिक खेळांकडे वाढता कल पाहता पारंपरिक कुस्ती क्रीडेचा प्रभाव कमी होत चालला होता. मात्र, खोची येथील ग्रामस्थांनी एकत्र येत ही परंपरा जिवंत ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी गावात कुस्ती सरावासाठी स्वतंत्र मैदान तयार करण्यात आले असून, येथे तरुणांना नियमित सराव करता येणार आहे.
या मैदानामुळे नवोदित आणि शिकाऊ पैलवानांना योग्य मार्गदर्शन आणि सरावाची संधी मिळणार आहे. अनुभवी पैलवानांकडून प्रशिक्षण देण्याचीही व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे गावातील तरुणांमध्ये कुस्तीबद्दल पुन्हा आकर्षण निर्माण होत आहे.
ग्रामस्थांच्या या उपक्रमामुळे केवळ खेळालाच प्रोत्साहन मिळणार नसून, ग्रामीण भागातील पारंपरिक क्रीडा संस्कृतीचे जतन होण्यासही मदत होणार आहे. तसेच, येथील पैलवान भविष्यात जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, खोची गाव पुन्हा एकदा कुस्ती परंपरेचे केंद्र म्हणून उदयास येण्याची चिन्हे दिसत आहे. परिणामी कुस्ती हा पारंपारिक खेळ कबड्डी खेळण्यासाठी खुर्ची येथील अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घेतला असून गावी यात्रेच्या निमित्ताने सदर महिला छोट्या मोठ्या कुस्त्यांच्या आयोजन करण्यात येते . पैलवान घडवण्यासाठी व उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी लागेल ते प्रयत्न करू असे गौरव उदगार खोची तालीम संघ व ग्रामस्थांच्यातून व्यक्त होत आहे
