मुलींच्या वसतीगृहात सामाजिक सप्ताह उत्साहात साजरा

कोल्हापूर:गारगोटी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय मुलींच्या वसतिगृहात महात्मा ज्योतिराव फुले यांची 200 वी जयंती व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त सामाजिक समता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारंभी गृहपाल सविता कांबळे व तालुका समन्वयक सुरेखा डवर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
प्रमुख व्याख्यात्या सुरेखा डवर यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या विषयी बोलताना सांगितले की , फुले यांनी तत्कालीन समाजात समता,बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार करण्यावर भर दिला तसेच त्यांचे विचार हे मानवतेचा व प्रगतीचा मार्ग दाखवणारे असल्याचे म्हणाल्या .

 

यावेळी वसतिगृहातील विद्यार्थिनी आरती कांबळे हिने आपले समयोचित विचार व्यक्त केले . या कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांचे मार्गदर्शन लाभले . याप्रसंगी निवासी शाळा अधिकारी अक्षय कुरणे,समाज कल्याण निरीक्षक अतुल पवार,आर.एम.देसाई यांच्यासह वसतिगृहातील कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

🤙 8080365706