कोल्हापूर :शेतकरी विकास सोसायटी माळवाडी ,गडमुडशिंगी येथे आज मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले.

या आरोग्य शिबिराचे आयोजन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या सहकार्यातून करण्यात आले होते.
यावेळी शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी हृदय रोगावरील तसेच मूत्रविकार तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरात सहभागी नागरिकांना हृदयरोग आणि मूत्र विकार रोगासंबंधी तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोक दांगट,जितेंद्र यशवंत, अमित माळी, चंद्रकांत नेर्ले, सुधाकर पाटील, अर्जुन कोगे, भगवान गोसावी, संजय सोनुले,पंचगंगा पाणीपुरवठा चेअरमन अनिल पाटील, विनायक पाटील, चंद्रशेखर पाटील, केशव मोरे आदी उपस्थित होते.
