गांधीनगरात नामांकित कंपनीचे बनावट लेबल लावून शर्टाची आणि चपलांची विक्री करणाऱ्या दोन दुकानावर छापा: २० लाखांचा मुद्देमाल जप्त

गांधीनगर:- गांधीनगर मुख्य रस्त्यावरील रिया गारमेंट आणि सचिन फुटवेअर या दुकानावर कॉपीराईटच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून युएस पोलो आणि पुमा कंपनीचे लेबल लावलेले सुमारे१९ लाख ३४ हजार ६५१ रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आकाश दीपकलाल डेंबानी (वय २५ रा . शिरू चौक गांधीनगर ) आणि रोहित श्याम वच्छानी ( वय ३५ रा गांधीनगर यांच्यावरती स्वामित्व हक्क कॉपीराईट अॅक्ट नुसार गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद कंपनीचे अधिकारी नीरजकुमार नरेंद्रसिंग धहीया (रा . गाझियाबाद उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली.

 

 

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी गांधीनगर मुख्य रस्त्यावर येथील अजय रहुजा यांचे रिया गारमेंट आहे. त्या गारमेंट मध्ये नामांकित युएसपी कंपनीचे ६१७ नग त्याची प्रत्येकी किंमत १६४९ आणि रेअर रॅबिट कंपनीचे लेबल असलेले १४७ त्यातील प्रत्येक शर्टची किंमत १६५४ रुपये साध्या गुणवत्तेच्या शर्टावर लेबल लावून ती चढ्यादराने विक्री केली जात होती. तसेच वळीवडे कॉर्नर येथील सचिन फुटवेअर येथे पुमा कंपनीचे लेवल लावून बूट आणि चप्पल विक्री होत असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली त्यांनी पोलिसांच्या मदतीने गारमेंट वर छापा टाकून कंपनीचे बनावट लेबल लावलेले ७८४ शर्ट आणि ५४७ जोड चप्पल‌, बूट असे सुमारे १९ लाख ३४ हजार ६५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे गांधीनगर आतील काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाची शटर बंद करून पोबारा केला. ही कारवाई शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईमध्ये कंपनीचे योगेश मोरे, मंगेश देशमुख, महेश चव्हाण, कान्हा या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

 

🤙 8080365706