कोल्हापूर : महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूरच्या वतीने नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाद्वारे उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उदघाटन मा.श्री.प्रमोद बाबर, जिल्हा उपाआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. बालाजी बिराजदार व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र कोल्हापूर, मा.श्री. इम्रान इनामदार RHS, ICICI बँक कोल्हापूर, मा.डॉ. गोविंद येनगे संशोधन अधिकारी ऊस व गूळ संशोधन केंद्र कोल्हापूर, मा. श्री. विलास बच्चे विभागीय सल्लागार पुणे विभाग, मा.श्री. सिद्धराम माशाळे विभागीय व्यवसाय विकास सल्लागार पुणे विभाग व मा.श्री. कुंदन शिनगारे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी, माविम कोल्हापूर हे उपस्थित होते.
नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प बचत गटाअंतर्गत उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनीमध्ये जवळपास 45 महिंला बचत गटाद्वारे विविध प्रकारचे खादय वस्तू व घरगुती वापराचे साहित्य सौंदर्य प्रसाधने विक्रीस उपलब्ध करण्यात आले आहे.
२७ मार्च २०२६ ते २९ मार्च २०२६ पर्यंत विक्री प्रदर्शन दैवज्ञ बोर्डिंग मंगळवार पेठ कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व महिला गट, नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि बचत गटातील महिला उत्पादकांकडून उत्पादित वस्तू, साहित्य विकत घ्यावे असे आवाहन मा.श्री.प्रमोद बाबर यांनी केले आहे तसेच मा.श्री. इम्रान इनामदार RHS, ICICI बँक कोल्हापूर, यांनी जास्तीत जास्त बँकेचा फायदा महिलांनी घ्यावा ICICI बँकेची साथ नेहमीच आपल्या माविम सोबत आहे. सर्व महिलांना अनुदान शासकीय लाभ कसा घेता येईल असे वक्तव्य केले. मा.श्री.डॉ.गोविंद येनगे ऊस व गूळ संशोधन केंद्र कोल्हापूर यांनी सेंद्रिय गूळ उत्पादन कसे घेता येईल शेतकरी महिलांना शेती साठी असणाऱ्या शासकीय योजनाचा लाभ कसा घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले मा.श्री.विलास बच्चे विभागीय सल्लागार पुणे विभाग, मा.श्री.सिद्धराम माशाळे विभागीय व्यवसाय विकास सल्लागार पुणे विभाग व मा.कुंदन शिनगारे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कोल्हापूर या सर्व मान्यवरांनी सर्व उपस्थित बचत गटांतील महिलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी मा. श्री कुंदन शिनगारे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय कलकुटकी, सुजाता कणसे, आशालता जमणे, जितेंद्र जाधव सर्व सीएमआरसी व्यवस्थापक उपजीविका सल्लागार लेखापाल व सर्व सहयोगिनी, CRP यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार मा. सौ. सुजाता कणसे जिल्हा प्रकल्प सल्लागार माविम कोल्हापूर यांनी केले.
००००००
