शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सकाळी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. नितीन माळी, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान प्रशालेचे संचालक डॉ. अजित कोळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील, डॉ. सुधीर देसाई, डॉ. संतोष सुतार, डॉ. उमेश गडेकर, डॉ. कविता वड्राळे, डॉ. वैशाली भोसले, डॉ. गजानन साळुंखे, चेतन गळगे, एच.ए. तिरमारे, डॉ. वैशाली सावंत, डॉ. परशुराम वडार, डॉ. प्रताप खोत, मृणालिनी जगताप, डॉ. उर्मिला दशवंत, डॉ. विश्वजित पाटील, सारंग कांबळे, वसुंधरा कांबळे, दशरथ एडके आदी उपस्थित होते.

🤙 8080365706