कोल्हापूर:इचलकरंजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने प्रथमच मुलींच्या भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता व्यंकोबा मैदान येथे हे कुस्ती मैदान रंगणार असून लहान-मोठ्या अशा एकूण ४८ कुस्त्या होणार आहेत, अशी माहिती पैलवान अमृतमामा भोसले यांनी दिली.

ते म्हणाले, महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी आणि मुलींना कुस्ती खेळात प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने महापालिकेने या
पै. सोनाली मंडलिक पै. दीक्षा सिंह
विशेष कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे. या मैदानाचे उद्घाटन आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते तर महापौर उदय धातुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी शहरातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
इचलकरंजी शहरात दीर्घ काळानंतर महिला कुस्त्यांचे आयोजन होत असल्याने या स्पर्धेबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. या मैदानात
८ ते २१ वर्ष वयोगटातील महिला कुस्तीपटू सहभागी होणार असून एकूण ४८ कुस्त्या रंगणार आहेत.
आंतरराष्ट्रीय पैलवान हिमानी यांच्यात कुस्ती होणार आहे या मैदानात इचलव्ह
शहरातील सुमारे २० मा कुस्तीपटू सहभागी होणार अ स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये याबा मोठी उत्सुकता आहे. कु मैदानाचे निवेदन ज्योतीराम आणि सुकुमार माळी आहेत.
स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाची कुस्ती अहिल्यानगरची आंतरराष्ट्रीय पैलवान सोनाली मंडलिक आणि हरियाणाची विश्व चॅम्पियनशिप विजेती पैलवान दीक्षा सिंह यांच्यात होणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी महिला महाराष्ट्र केसरी पैलवान प्रतिक्षा बागडी (सांगली) आणि उपमहाराष्ट्र केसरी तसेच राष्ट्रीय विजेती पैलवान विदिका पवार (सातारा) यांच्यात सामना रंगणार आहे. तसेच तृतीय क्रमांकासाठी कागलची आंतरराष्ट्रीय पैलवान सृष्टी भोसले आणि हरियाणाची
दरवर्षी महिला महोत्सवात कुस्ती मैदानाचा व्हावा, यासाठी प्रयत्न असल्याचे नगरसेविका दळवाई, स्मिता तेलनाडे नगरसेवक सुशांत सचिन माळी
