कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

कोल्हापूर: कुंभी-कासारी साखर कारखान्याचे यावर्षीच्या गळीत हंगामात ४ लाख ८८ हजार ८७० मेट्रिक टन ऊस गाळप केले असून सरासरी १२.५५ टक्के साखर उतारा मिळाल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन, आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली. कुडित्रे येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या ६३ व्या गळीत हंगामाच्या सांगताप्रसंगी आमदार नरके बोलत होते. यावेळी संचालक बळवंत दादू पाटील-करचे (यवलूज) व त्यांच्या पत्नी मंगल पाटील-करचे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली.

आमदार नरके म्हणाले, यावर्षीचा
गळीत हंगाम १५ नोव्हेंबर रोजी सुरू होऊन ९४ दिवस गळीत हंगाम मिळाला. या हंगामात ४ लाख ८८ हजार ८७० मेट्रिक टन ऊस गाळप करून ६ लाख १५ हजार ३५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन करण्यात आले. यावर्षी कारखान्याला १२.५५ टक्के साखर उतारा मिळाला. कोजनरेशन प्रकल्पातून ४ लाख ७८ हजार किलो वॅट वीज निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षी कारखान्याने प्रति टन

३५६० रुपयांप्रमाणे ऊस बिल ३१

डिसेंबरअखेर अदा केले आहे. १

जानेवारी ते १६ फेब्रुवारी अखेर

बिल चेकिंग घेतले असून हे

ऊस बिल लवकरच वर्ग करणार

असल्याचे त्यांनी सांगितले. उसाची

एफआरपी व उत्पादनातील इतर सर्व

खर्चाच्या घटकांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता साखरेची एमएसपी ४१०० ते ४२०० रुपये प्रति क्विंटल करणे असल्याचे त्यांनी सांगितले.

🤙 8080365706