कोल्हापूर:करवीर पंचायत समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच पंचायत समितीवर भाजप – राष्ट्रवादी-शिवसेना महायुतीचा झेंडा फडकणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सभापतीपद मिळणार असून भाजपाला उपसभापतीपद निश्चित आहे. करवीर पंचायत समितीच्या ७ फेब्रुवारी रोजी २४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राहुल पाटील- सडोलीकर यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागा, आमदार अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजपला ६ जागा तर आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे शिवसेनेला ३ जागा मिळाल्या आहेत.

आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसला ८ जागा
मिळाल्या आहेत. मात्र सर्वाधिक जागा जिंकूनही १३ जागांचा बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्याने यावेळी काँग्रेसला प्रथमच सत्तेबाहेर राहावे लागणार आहे. राहुल पाटील (सडोलीकर) यांनी सभापती, उपसभापतींची नावे निश्चित करण्यासाठी सोमवारी बैठक आयोजित केल्याचे सांगून या बैठकीतच ही नावे निश्चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी ११ वाजता करवीर पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात करवीरचे स्वप्नील पवार यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांची बैठक होणार असून या बैठकीत सभापती, उपसभापती निवडी होणार आहेत. त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. करवीरचे गटविकास अधिकारी संदीप भंडारे, साहाय्यक गटविकास अधिकारी सुहास पाटील यांच्या उपस्थितीत या निवडी
