डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘वूमन इन लीडरशिप’ कार्यक्रम उत्साहात -आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजन

कसबा बावडा:डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजीमध्ये महिला विकास कक्षातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त “वूमन इन लीडरशिप : ड्रायविंग इंनोव्हेशन अँड मीनिंगफ़ुल इम्पॅक्ट ” या विषयावर विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नेतृत्व, नवोपक्रम आणि समाजातील महिलांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले.

 

 

यामध्ये इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट एंड कल्चरल हेरिटेजच्या कन्व्हेनर आर्किटेक्ट अमरजा राजाराम निंबाळकर, तेज कुरिअर्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर साधना सुरेश घाटगे, मेनन पिस्टन्सच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर शरण्या सचिन मेनन, भरतनाट्यम नृत्यांगना सौ. कविता नायर आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व समुपदेशक डॉ. उर्मिला सुरेश भोसले यांनी आपल्या अनुभवांद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

डी. वाय. पाटील ग्रुपच्या सदर कार्यक्रमाला सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम, सर्टिफाइड योगा टीचर, योगा इंस्ट्रुक्टर पूनम गुप्ता, इंटर्नल कॅम्पलायंन्स कमिटीच्या (आय.सी.सी.) माजी प्रमुख डॉ. क्षमा कुलहल्ली व सामाजिक कार्यकर्त्या डॉ . रचना संपतकुमार याची विशेष उपस्थिती होती.

चर्चासत्रामध्ये विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी नेतृत्व करताना अनुभवलेली आव्हाने, संधी आणि यशस्वी वाटचाल यावर सखोल विचारमंथन केले. उद्योजकता, कला, सामाजिक क्षेत्र आणि मानसशास्त्र अशा विविध क्षेत्रांतील अनुभव मांडताना वक्त्यांनी आत्मविश्वास, सातत्य आणि नवोन्मेषी विचारसरणीचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत संवाद साधला, त्यामुळे हे चर्चासत्र प्रेरणादायी व ज्ञानवर्धक ठरले.

आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर यांनी वारसा वास्तू संवर्धन आणि बांधकाम क्षेत्रात महिलांची वाढती भूमिका अधोरेखित करत तरुणींनी वास्तुशास्त्र व संवर्धन क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले. साधना घाटगे यांनी उद्योगक्षेत्रातील अनुभव सांगत नेतृत्व, शिस्त आणि निर्णयक्षमता यांचे महत्त्व स्पष्ट केले. शरण्या मेनन यांनी आधुनिक उद्योगव्यवस्थेत नवोन्मेषी विचार आणि तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. कविता नायर यांनी कला आणि संस्कृती क्षेत्रातून व्यक्तिमत्त्व विकास व आत्मविश्वास वाढवण्याचे महत्त्व सांगितले तर डॉ. उर्मिला सुरेश भोसले यांनी मानसिक आरोग्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी याबाबत मार्गदर्शन केले. श्रीलेखा साटम यांनी योग्य मनुष्यबळ निवडताना घ्यावी लागणारी काळजी, जबाबदारीचे वाटप, कामाचे व्यवस्थापन, आत्मविश्वास विविध कौशल्यांची गरज यावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला अभियांत्रिकी व वास्तुकला विभागातील सर्व महिला प्राध्यापक तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी आयसीसी प्रेसिडिंग ऑफिसर एन. डी. जिरगे आणि फॅकल्टी कोऑर्डिनेटर इंजि. गौरी म्हेतर यांनी विशेष मेहनत घेतली.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

🤙 8080365706