कोल्हापूर:जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर महानगरपालिका परिवहन समितीचे सदस्य रोहन अतिग्रे यांच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागातील कर्मचारी महिलांचा नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते भेटवस्तू वाटप करण्यात आले.

के. एम. टी च्या प्रधान कार्यलयातील सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास नगरसेविका मंगल साळोखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी महिला कर्मचारी यांच्याशी संवाद साधत शिवसेना महिला आघाडी आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने महिलांना स्वच्छता गृह उपलब्ध करून देण्यात यावी, महिला कर्मचारी यांना प्रमोशन देण्यात यावे आदी सह प्रमुख मागण्या समजून घेत,त्या सोडवण्यासाठी लवकरात लवकरच महानगरपालिका प्रशासनासोबत चर्चा करून योग्य निर्णय घेऊन न्याय देऊ, असे नगरसेविका सौ. साळोखे यांनी सांगितले.
यानंतर झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेविका सौ.मंगल साळोखे,परिवहन समितीचे सदस्य रोहन अतिग्रे यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तू चे वाटप करण्यात आले.
या अनोख्या उपक्रमा बद्दल समाधान व्यक्त करत आजपर्यंत असा सन्मान आमचा कधीच झाला नसल्याची भावना व्यक्त करताना महिलांना अश्रू अनावर झाले.
या कार्यक्रमास महिला आघाडी शहरप्रमुख सौ. पवित्राताई रांगणेकर, महानगर संघटिका श्रीमती पूजाताई भोर, सौ. दिपा अतिग्रे, सौ. पूजा कामते,युवतीसेना शहरप्रमुख सौ. तेजस्विनी घाडगे,केदार अतिग्रे, आनंद पाटील,शिवसेना सोशल मिडिया पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सौरभ कुलकर्णी, सोशल मिडिया उपजिल्हाप्रमुख अक्षय घाडगे, शहर सरचिटणीस नागेश जोंदाळ, शहर समन्वयक स्वराज पाटील, सौ. राधिका अतिग्रे, शोभा अतिग्रे, स्मिता अतिग्रे आदी उपस्थित होते.
