प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्या: आ. सतेज पाटील 

कोल्हापूर:राज्य सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात बडा घर पोकळ वासा आहे. निवडणुकीत जी आश्वासने सरकारने दिली होती ती पाळली नाहीत. शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करण्याचा शब्द सरकारने सोयिस्करपणे फिरवला आहे.

 

कोल्हापूरमधील ७० टक्के शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच लाख हून अधिक शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज परतफेड केलेली आहे. या प्रामाणिक शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्यावे. जाचक नियम व अटी न लावता सरसकट सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे. असे आ. सतेज पाटील म्हणाले.ते पुढे म्हणाले,

तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न वाढत असताना अर्थसंकल्पात ठोसपणे यावर उपाय काढलेला नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांचा खेळ आणि जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे. हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या खऱ्या वेदनेवर फुंकर घालण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. राज्य सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे कॉन्ट्रॅक्टर पास अन शेतकरी, मध्यमवर्गीय, युवक नापास असाच आहे.

 

🤙 8080365706