पल्स च्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण व आरोग्य क्षेत्राला नवी दिशा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई:पल्स च्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण व आरोग्य क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईत विधान भवनमध्ये मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या दालनामध्ये हे सादरीकरण झाले.

 

 

या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. PULSE च्या माध्यमातून पुढील दशकातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील नवोन्मेष यांची दिशा निश्चित करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. वैद्यकीय शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील नवोन्मेषासाठी महाराष्ट्राला जागतिक स्तरावर ठाम स्थान प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वानी एकत्रितपणे प्रयत्न करूया.

वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, PULSE च्या माध्यमातून अभ्यासक्रम रचना, मूल्यमापन प्रणाली, प्राध्यापक विकास कार्यक्रम तसेच क्लिनिकल प्रशिक्षण मॉडेल्स या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यासाठी जागतिक संस्थांना आमंत्रित करण्यात येत आहे. PULSE हा केवळ एक कार्यक्रम न राहता दीर्घकालीन चळवळ बनविण्यासाठी आपण सर्वानी सहकार्य करावे. यामध्ये वैद्यकीय पर्यटन, आरोग्य संवर्धन प्रणाली व एकात्मिक आरोग्य सेवा मार्ग (Integrated Car Pathwavs) यांचा समावेश असेल. आमची महत्वकांक्षा केवळ जागतिक मानकांशी समतुल्य राहण्याप्रती मर्यादित नसून, आरोग्य व वैद्यकीय शिक्षणाच्या भविष्यासंदर्भातील जागतिक चर्चेत सक्रिय भूमिका बजावण्याची आहे. या शैक्षणिक बळावर महाराष्ट्र जागतिक पातळीवर अधिक प्रभावी भूमिका बजावण्यासाठी सक्षम होईल.

■ PULSE २०२६ ची उहिष्टे……
□ PULSE २०२६ हे जागतिक विद्यापीठे, आरोग्य क्षेत्रातील नेतृत्व, संशोधक, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी व नवोन्मेषक यांना एकत्र आणणारे एक व्यापक व्यासपीठ म्हणून विकसित करण्यात आले आहे. याद्वारे वैद्यकीय शिक्षणाच्या भविष्यासंदर्भात एकत्रित विचारमंथन होईल.

□ शैक्षणिक सुधारणा, वैज्ञानिक क्षमता वृद्धी आणि आरोग्य सेवा वितरण या सर्व बाबी परस्पर समन्वयातून पुढे जाव्यात हा आमचा प्रमुख उद्देश आहे.

□ आंतरराष्ट्रीय संस्थांशी सातत्यपूर्ण संवाद व सहकार्य प्रस्थापित करून अध्यापन, प्रशिक्षण व तंत्रज्ञानाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य जागतिक मानकांशी सुसंगत राहील. यासाठी PULSE महत्त्वपर्ण ठरेल.

□ या माध्यमातून राज्यातील विद्यर्थ्यांसाठी संशोधनाच्या संधी वाढविणे, गुणवंत मनुष्यबळाची साखळी अधिक सक्षम करणे तसेच जागतिक दर्जाच्या कल्पना व संकल्पनांपर्यत आपल्या संस्थांना प्रवेश मिळवून देणे हे उद्दिष्ट आहे.

■ महाराष्ट्राची जागतिक आरोग्य व शिक्षण केंद्र म्हणून मांडणी……

□ महाराष्ट्र राज्याकडे उत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालये, प्रगत रु्णालये, सक्षम औषधनिर्मिती क्षेत्र तसेच उदयोन्मख मेडटेक परिसंस्था अशी भक्कम पायाभूत संरचना उपलब्ध आहे.

□ राज्य शासन वैद्यकीय शिक्षण अधिक कौशल्याधारित (Competency-driven), प्रात्यक्षिकाधारित (Hands-on) व आधुनिक क्लिनिकल तसेच; डिजिटल वातावरणाशी सुसंगत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

□ या सर्व घटकांचा समन्वय साधून महाराष्ट्राला वैद्यकीय शिक्षण, संशोधन भागीदारी व आरोग्य क्षेत्रातील ‘नवोन्मेष यांसाठी प्राधान्याचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा मानस.

□ विद्यर्थ्याना केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता सिम्यूलेशन प्लॅटफॉर्म, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधने. संशोधन प्रयोगशाळा व प्रत्यक्ष नवोन्मेष परिसंस्था यांच्या माध्यमातून शिक्षण देण्यावर भर.

□ ट्रान्सलेशनल रिसर्च, प्रिसिजन मेडिसिन, पुनरुत्पादक विज्ञान (Regenerative Sciences) व डिजिटल हेल्थ या क्षेत्रांमध्ये जागतिक
स्तरावर होत असलेल्या प्रगतीचा लाभ विद्यर्थ्याना मिळावा, यासाठी शैक्षणिक सुसंगती अधिक बळकट करण्यात येईल. हा कॉन्क्लेन्ह बहु-हितधारक सहकार्याला चालना देईल, ज्यामुळे शैक्षणिक उत्कृष्टता व आर्थिक प्रगती यांना पूरक अशा धोरणात्मक चौकटी विकसित करता येतील.

यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, डॉ. मुफझ्झल लकडावाला, आदर पुनावाला, डॉ. विश्वजीत कदम आदींसह वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

🤙 8080365706