भाजप युवा मोर्चाचे नुतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे कोल्हापुरात भव्य रॅलीने जल्लोषी स्वागत, वर्षभरात एक लाख युवक-युवतींना भाजपशी जोडणार, युवा मोर्चाचे संघटन मजबूत करणार, कृष्णराज महाडिक यांंची माहिती

कोल्हापूर :भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे आज कोल्हापुरात आगमन झाले. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची तरूणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. त्यामुळे कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी छत्रपती ताराराणी चौक येथे प्रचंड गर्दी झाली होती. महाराणी ताराराणी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापर्यंत भव्य रॅली काढून कृष्णराज महाडिक यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे फोटो असलेले फलक आणि भाजपाचा ध्वज हातात घेतलेल्या तरूणाईमध्ये सळसळता उत्साह होता. पक्षाने टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवणार असल्याचे सांगत, वर्षभरात एक लाख युवक-युवतींना भाजपाशी जोडण्यात येईल आणि भाजप युवा मोर्चाचे संघटन राज्यात मजबुत करणार असल्याचे युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नमुद केले. रॅलीनंतर भाजप जिल्हा कार्यालयात कृष्णराज महाडिक यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी जिल्हयातील कार्यकर्त्यांनी आणि युवा वर्गाने मोठी गर्दी केली होती.
युथ आयकॉन आणि कोल्हापूरचे सुपूत्र कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली आहे. राज्यस्तरावरील प्रदेशाध्यक्षासारखं महत्वाचे पद कोल्हापुरला मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि तरूणाईमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे आज दुपारपासून भाजप कार्यकर्ते आणि तरूणाईचे जथ्थे ताराराणी चौकाच्या दिशेने येत होते. छत्रपती ताराराणी चौक कार्यकर्त्यांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता. सायंकाळी पाच वाजता कृष्णराज महाडिक यांचे छत्रपती ताराराणी चौकात आगमन झाले. भागीरथी महिला संस्थेच्या वतीने कृष्णराज महाडिक यांचे औक्षण करण्यात आले. छत्रपती ताराराणी यांच्या पुतळयाला अभिवादन करून, रॅलीला सुरवात झाली. सजवलेल्या वाहनावर कृष्णराज महाडिक यांच्यासोबत खासदार धनंजय महाडिक, महापौर रूपाराणी निकम, प्रा. जयंत पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, महानगराध्यक्ष विजय जाधव, मुरलीधर जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते होते. भाजपचे ध्वज आणि कृष्णराज महाडिक यांचा फोटो असलेले फलक हातात घेवून भाजप आणि कृष्णराज महाडिक यांच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, रेल्वे स्टेशन, बी न्यूज कॉर्नर मार्गे रॅली व्हिनस कॉर्नर चौकात आली. याठिकाणी कृष्णराज महाडिक यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळयाला अभिवादन केले. त्यानंतर दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळयाला फुलं अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आईसाहेब महाराज पुतळा मार्गे ही रॅली बिंदू चौकात आली. बिंदू चौकातील शाहू, फुले, डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयाला युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पुष्पहार अर्पण केला. रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी कृष्णराज महाडिक यांचे औक्षण केले. तसेच त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. या रॅलीत चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भिमा कारखान्याचे चेअरमन विश्‍वराज महाडिक, नगरसेवक विजयसिंह देसाई, माधुरी नकाते, जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील, प्रताप पाटील-कावणेकर, देवराज बारदेस्कर, महेश पाटील, चंद्रकांत घाटगे, संग्राम निकम, महेश वासुदेव, राजसिंह शेळके यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, भाजपाचे पदाधिकारी तसंच युवा मोर्चाचे राज्यभरातील आणि जिल्हयातील पदाधिकारी सहभागी झाले होते.
एकच चर्चा… युवा मोर्चा…, कृष्णराज महाडिक यांचा विजय असो, यासह विविध घोषणा देत या रॅलीचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोषी समारोप झाला. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून गेला होता. माजी नगरसेवक किरण शिराळे, नगरसेवक विशाल शिराळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी केली. त्यामध्ये प्रीतम शिराळे, मंगेश नरोटे, अमित मंडपे, गौतम झाड, संदीप खाडे, सचिन रोटे, सागर धुमाई, वृषाली शिराळे, अस्मिता शिराळे, प्रणाली बावडेकर, शीतल शिराळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या पुष्पवृष्टीत सहभाग घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी महाडिक आणि भाजपचा जयघोष केला. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे स्वागत आज ठिकठिकाणी जल्लोषात झाले. स्टेशन रोडवरून ही रॅली पुढे आली. तिथे नगरसेविका निलिमा पाटील, शैलेश पाटील, तसेच भाजपा शाहुपूरी कोअर कमिटी सदस्य आणि स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातून गोकुळ हॉटेल कॉर्नरला रॅलीचे जल्लोषी स्वागत झाले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्यांना आणि नागरिकांना सहा हजार पाण्याच्या बाटल्या, कोकम सरबत, आंबा बर्फीचे वाटप करण्यात आले.
दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे नागाळा पार्कातील भाजप कार्यालयात आगमन झाले. येथे त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावतीने जल्लोषी स्वागत झाले. एकच चर्चा.. युवा मोर्चा… या घोषणांनी भाजप कार्यालय आणि परिसर दुमदुमून गेला. दरम्यान कृष्णराज महाडिक यांचे स्वागत करताना त्यांना विठ्ठलाची प्रतिमा दिली. तसेच वारकरी वेश परिधान करायला लावला. गळयात तुळशी हार घातला. काहींनी शाल, काहींनी बुके, तर काहींनी गुलाबपुष्प देवून कृष्णराज महाडिक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यालयात भाजप प्रदेश सदस्य महेश जाधव, जिल्हा परिषदेचे भाजपा गटनेते तानाजी पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य महेश चौगले, नररसेवक विजय जाधव, राजसिंह निंबाळकर, नाथाजी पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्‍वजित पोवार, रवीश पाटील, प्रशांत बुगले, ऍड. संपतराव पवार, दिलीप मैत्राणी, मामा कोळवणकर, अनुप देसाई, समयश्री कुमार अय्यर, डॉ. सदानंद राजवर्धन, शंतनू मोहिते, ओमवीर महाडिक, जयेश घरपणकर, अवधुत अपराध, सुधीर राणे यासोबतच मोहळ, सांगोला, पळूज, सिकंदर टाकळी इथले सामाजिक कार्यकर्ते, भाजप पदाधिकार्‍यांनी कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
तत्पूर्वी भाजप युवा मोर्चाच्या नूतन प्रदेशाध्यक्षपदी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या आठवड्यात सर्वानुमते निवड केली. त्यानंतर आज कृष्णराज महाडिक यांचे कोल्हापुरात आगमन झाले. दुपारी ३ वाजता रुईकर कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांच्यावतीने कृष्णराज यांचे हृदयस्पर्शी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करत औक्षणासह, मिठाई भरवून कृष्णराज यांचे महाडिक परिवाराकडून स्वागत करण्यात आले. या छोटेखानी स्वागत कार्यक्रमामुळे महाडिक परिवारामध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांनी राज्यातील भाजप पक्ष संघटनात्मक कार्यकारिणी गेल्या आठवड्यात जाहीर केली. त्यामध्ये भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची निवड केली. मान दिलेल्या शब्दांचा, अभिमान युवा नेतृत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा आणि जल्लोष कार्यकर्त्यांचा असंच पक्षाच्या या निवडीचे वर्णन करता येईल. कृष्णराज महाडिक यांच्या निवडीने राज्यातील युवा वर्गात चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीनंतर गेले आठवडाभर कृष्णराज महाडिक पक्षाच्या कामानिमित्त मुंबईतच थांबून होते. आज त्यांचे कोल्हापुरात आगमन झाले. दुपारी ३ वाजता कृष्णराज यांचे त्यांच्या रुईकर कॉलनी इथल्या निवासस्थानी आगमन होताच, कुटुंबिय आनंदित झाले. फटाक्यांची आतषबाजी करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आई सौ. अरुंधती महाडिक, आजी श्रीमती शकुंतला महाडिक, मंगल महाडिक यांच्यासह परिवाराने कृष्णराज यांचे औक्षण केले. गुलाब पुष्पांचा वर्षाव करत, मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. यावेळी कृष्णराज यांनी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला. कृष्णराज यांना घट्ट आलिंगन देत कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अतिशय भावनिक वातावरणात झालेल्या या स्वागत सोहळ्याने कृष्णराज महाडिक भारावून गेले होेते. भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करुन पक्षाने आपल्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी आपण कृतीतून सिध्द करुन दाखवू, असा निर्धार कृष्णराज महाडिक यांनी बोलून दाखवला. राज्यात १८ ते २८ वयोगटातील युवा वर्गाची संख्या मोठी आहे. या युवाशक्तीला राजकारण, समाजकारणात आपण सक्रीय सहभागी करुन घेणार आहे. सुमारे १ लाख युवा कार्यकर्त्यांना भाजप युवा मोर्चाशी जोडण्याचा आपला संकल्प असून, त्यातून एक सक्षम युवा महाराष्ट्राची बांधणी करणार असल्याचा मनोदय कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला.
येत्या ५ वर्षात युवा वर्गासाठी आपले सामाजिक व्हीजन मोठे आहे. त्यासाठी आपण लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, असेही कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांची राज्य सभेवर निवड झाल्यानंतर महाडिक कुटुंबियात जे आनंदी वातावरण होते, त्याचे आनंदी वातावरणाची प्रचिती आज कृष्णराज महाडिक यांच्या निवडीच्या निमित्ताने आली. कृष्णराज यांच्या निवडीच्या निमित्ताने या आठवणींना श्रीमती शकुंतला महाडिक यांनी उजाळा दिला. गेल्या ४ महिन्यात राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युवा पिढी मोठ्या प्रमाणावर उतरली होती. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर युवा वर्ग निवडूनही आला आहे. त्यामुळे या युवा वर्गाचे राज्यस्तरीय नेतृत्व करण्याची जबाबदारी खर्‍या अर्थाने युवा वर्गाचे आयड़ॉल असणार्‍या कृष्णराज महाडिक यांच्यावर भाजपने सोपवली आहे, हेच त्यांच्या निवडीवरुन सिध्द होत आहे.

🤙 8080365706