कोल्हापूर: इंदापूर येथे २०१२ साली झालेल्या ऊस आंदोलनात एकुण ८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज या ८ गुन्ह्यापैकी ३ गुन्ह्यातून राजू शेट्टी यांच्यासह सतिशभैय्या काकडे, सदाभाऊ खोत, निलेश देवकर यांच्यासह २१ आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली .

२०१२ साली आम्ही ऊस आंदोलनात २७०० रूपये पहिली उचलीची मागणी केलेली होती. राज्यातील साखर कारखानदार कोणीच दर जाहीर केले नव्हते. त्यावेळेस राज्याचे तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पदाची जबाबदारी स्विकारून तोडगा काढावा म्हणून कर्मयोगी साखर कारखान्यावर धरणे आंदोलन करण्यात आले होते.
