काँग्रेसचा विचार हा ग्रामिण महाराष्ट्राचा विचार : आ. सतेज पाटील

कोल्हापूर:मुडशिंगी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आज वळिवडे येथील जाहीर सभेला माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह आ . सतेज पाटील यांनी उपस्थित राहून मतदारांना संबोधित केले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हा ग्रामीण विकासाच्या कणा आहेत. आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगार हे सगळे विषय थेट याच संस्थांशी जोडलेले आहेत. काँग्रेसचा विचार हा ग्रामिण महाराष्ट्राचा विचार असल्याने या संस्थांवर काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

वळिवडेच्या सरपंच रूपाली कुसाळे, चिंचवडच्या सरपंच श्रद्धा पोतदार, मुळशिंगेच्या सरपंच अश्विनी शिरगावे, गांधीनगरच्या सरपंच संदीप पाटोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब माळी, संजय पाटील, शेतकरी संघाचे संचालक आनंदा बनकर, पंचायत समिती सदस्य सचिन पाटील, यांच्यासह उमेदवार रावसाहेब पाटील, प्रताप चंजवाणी, निता कांबळे तसेच रणजीत कुसाळे, सुहास तामगावे, प्रकाश पासला, प्रल्हाद शिरोटे, रघुनाथ जगताप, राजाराम पवार, गणपती जाधव, राजू कांबळे, बाबासो कांबळे, अविनाश साळुंखे, कपिल घाडगे यांच्यासह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

🤙 8080365706