कागलच्या युतीचा आदर्श राज्याला देवूयासंजयबाबा घाटगे यांचा निर्धार : म्हाकवेत जाहीर सभा

म्हाकवे:
कागल तालुक्यातील संघर्ष व अविश्वासाच्या राजकारणामुळे फार मोठे नुकसान झाले. हे वातावरण आता संपविण्याची वेळ आली आहे. कार्यकर्त्यानी मनात कोणताही अभिनिवेश न बाळगता सर्वच्या सर्व १८ उमेदवार उच्चांकी मतांनी निवडून आणून आपल्या युतीतील एकसंधपणाचा आदर्श राज्याला दाखवून देवूया, असा निर्धार माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केला.

म्हाकवे ता. कागल येथे भाजप- राष्ट्रवादी युतीच्या म्हाकवे जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार काकासाहेब सावडकर, म्हाकवे पंचायत समिती मतदार संघाच्या उमेदवार सौ. रंजना अस्वले, यमगे पंचायत समिती मतदारसंघाच्या उमेदवार सौ. रूपाली अंगज यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत श्री. घाटगे बोलत होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, तालुक्यात गेल्या दहा वर्षात मोठा संघर्ष झाला. त्यामुळे गोर-गरीब सर्वसामान्य जनतेची परवड झाली. ती थांबवुन शासनाच्या योजनांचे लाभ मोठ्या प्रमाणात मिळवून देण्यासाठी आम्ही तिघे एकत्र आलो. आमच्या युतीबाबत विरोधक पसरवत असलेल्या गैरसमजाकडे लक्ष देऊ नका. गावा-गावात एकत्र या. विधानसभेच्या निवडणुकीआधी जाहीर केल्याप्रमाणे महायुतीच्या सरकारने गेल्या वर्षभरात लाडक्या बहिणींच्या पंधराशे रुपये दरमहा नियमितपणे खात्यावर जमा केले आहेत. ही रक्कम एकवीसशेहे रुपये केल्याशिवाय राहणार नाही.

उसन्या उमेदवारांवर मदार…..!
समरजीत घाटगे म्हणाले, मंत्री श्री. मुश्रीफ आणि आपल्यातील संघर्ष १० वर्षानंतर तर दोन घाटगे गटातील संघर्ष २२ वर्षांनंतर संपला आहे. आपली युती मजबूत झाली आहे. विरोधातील मंडळींना अनेक ठिकाणी उसने उमेदवार घ्यावे लागत आहे. विरोधांकडे कोणताही अजेंडा नाही.
कुस्ती १८-० ने निकाली करा….!
जिल्हा परिषद व पंचायत समिती ही दीनदलित सामान्य माणसाला शक्ती देणारी केंद्रे आहेत. गावा-गावातील संघर्ष संपवून निवडणुकीची ही कुस्ती १८-० ने निकाली करा. या उच्चांकी मताधिक्याने होणा-या विजयात सर्वांनीच भागीदारी करुया, असे आवाहन अंबरिषसिंह घाटगे यांनी केले.

यावेळी गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे,विजय काळे यांनीही मनोगत व्यक्त केले.व्यासपीठावर गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील,सरपंच आशाताई कांबळे, उमेदवार काकासाहेब सावडकर, रंजना भोसले, रुपाली आंगज, ए.वाय.पाटील, माजी उपसरपंच धनंजय पाटील, रमेश पाटील, आदीनाथ पाटील, विजय पाटील, ए. डी. पाटील आदी उपस्थित होते.

🤙 8080365706