शहराच्या विकासाला दिशा देणारा सकारात्मक संघर्ष आपल्याला करायचा आहे : आ. सतेज पाटील 

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या 34 नगरसेवकांच्या सत्कार सोहळा  खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आमदार जयंत आसगावकर, आ . सतेज पाटील,माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, ऋतुराज संजय पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटीत पार पडला.

महापालिकेमध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शहराच्या विकासाला दिशा देणारा सकारात्मक संघर्ष आपल्या सर्वांना करायचा आहे. चुकीच्या धोरणांना ठामपणे विरोध आणि जनतेच्या हिताच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे ही आपली महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. असे आवाहन आ . सतेज पाटील यांनी करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर, सुर्यकांत पाटील- बुद्धीहाळकर, आनंद माने, तौफिक मुल्लाणी, भारतीताई पोवार, बाबासाहेब सरनाईक, भरत रसाळे, विनायक घोरपडे, ऋषिकेश पाटील, भाऊसाहेब आसबे, वैदवती मोहिते यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706