गोरगरिबांना ठेच लागली तरी आमच्या नगरसेवकांना कळ येईल असे ऋणानुबंध निर्माण करतील;वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

कोल्हापूर:
लोकप्रतिनिधी आणि जनता हे नाते जीवाभावाचे असते. गोरगरिबांना ठेच जरी लागली तरी कळ आमच्या नगरसेवकांना येईल असे ऋणानुबंध महायुतीचे सर्वच नगरसेवक निर्माण करतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ यादवनगर, जवाहरनगर, प्रतिभानगर, राजेंद्रनगर येथे झालेल्या जाहीर प्रचारसभांमधून मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होता.

मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, गरिबाना सरकारी रुग्णालयात उपचार घेणं अधिक सोयीचं वाटत. हा विचार करूनच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे चित्र पालटले आहे. ही आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी महायुतीला पाठिंबा द्या. ते पुढे म्हणाले, रस्ते, गटर्स, घनकचरा प्रकल्प, सीसी टिव्ही, स्वच्छतागृहांची उभारणी यासोबतच अंबाबाई आणि जोतिबा विकास आराखडा राबवणं, यात्रीनिवास, हॉटेल्स, प्रवाशांसाठी भाडेतत्वावर फ्लॅट, पार्कींग सुविधा उत्तम करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळं मोठ्याप्रमाणात शहरात येणार्‍या पर्यटकांना सेवा सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळं कोल्हापूरच्या दरडोई उत्पन्नात भरघोस वाढ होईल. सर्व घटकांना व्यवसाय प्राप्त होईल. हे फक्त महायुतीच करू शकते. कारण यासाठी आवश्यक असणारा निधी, या माध्यमातूनच उपलब्ध होणार आहे. त्यामुळं महायुतीच्या मागे उभे रहा.

आमदार अमल महाडिक म्हणाले, या प्रभागातील प्रॉपर्टी कार्ड धारकांचे प्रश्न माझ्यापरीने मी निकालात काढलेलेच आहेत. परंतु; ज्यांचे प्रश्न अजूनही शिल्लक आहेत ते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहयोगातून निश्चितच सोडवू. महायुतीचा जाहीरनामा हा कर्तव्यनामा आहे. विरोधकांनी जाहीरनामा काढायलाच नको पाहिजे होता. कारण; त्यांनी जर एवढं काम केलं असेल तर जाहीरनामा काढायची गरजच काय?

श्री. महाडिक पुढे म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून होत असलेल्या विकासाची प्रचिती शेंडा पार्कमध्ये साकारत असलेल्या अकराशे बेड्सच्या हॉस्पिटलमधून होते. मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून होत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये दररोज हजारो गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार होणार आहेत. अगदी किरकोळ आजारापासून मोठ्या आजारावरील उपचारासाठी रुग्णाला पुणे, मुंबईला जावे लागणार नाही.

यावेळी विजय जाधव व विजय काळे यांचीही मनोगते झाली.

कल्याणकारी योजना घराघरापर्यंत राबवू…..!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून प्रभागनिहाय कोल्हापूर शहराचा विकास तर होईलच. दरम्यान; महायुतीचे सर्वच नगरसेवक नागरिकांच्या आणि विशेषता गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना घराघरापर्यंत पोहोचतील. यामध्ये वृद्ध निराधार दिव्यांगांसाठी पेन्शन योजना, बांधकाम कामगार कल्याणकारी योजना, बेघरना मजबूत पक्की घरे, विविध आरोग्याच्या योजना अशा अनेक योजनांचा समावेश आहे.

🤙 8080365706