कोल्हापूर:
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखतींना इच्छुकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजर्षी शाहू मार्केट यार्डातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के पी पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, मानसिंगराव गायकवाड, करवीरचे युवा नेते राहुल पाटील (भैय्या), गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे आदी प्रमुख उपस्थित होते.
आज पहिल्या दिवशी करवीर, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, कागल या तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या.
मुलाखती झालेल्या तालुका निहाय प्रमुख उमेदवारांची नावे अशी…..
करवीर – पंडित नलवडे, भारत माळी, प्रदीप पाटील, संभाजी पाटील, प्रवीण पाटील, संतोष पोर्लेकर, चेतन पाटील, पृथ्वीराज सूर्यवंशी, रेखा मुगडे, सचिन पाटील, दत्तात्रय मुळीक, सर्जेराव पाटील, अमित पाटील, एकनाथ वरुटे, संदीप पाटील, विजय उर्फ मनोज पाटील, साताप्पा पाटील, दिग्विजय पाटील, मदनकुमार पाटील, मेघा पाटील, आशा पाटील, मोहन पाटील, मच्छिंद्र कांबळे, हिंदुराव कांबळे, उर्मिला पाटील, मेघा नाळे, राणीताई पाटील, निवृत्ती पाटील, विलास भोसले, अरविंद कारंडे,
शाहूवाडी – मीनाक्षी पाटील, अमरसिंह चौगले, विठ्ठल पोवार, रजकुबेर गायकवाड, लक्ष्मी पाटील
हातकणंगले- विजया आळतेकर, जयसिंग कांबळे, अस्मिता तांबवे, बबन इंगळे, राहुल कांबळे, विकास पाटील, संभाजी पवार, राम कांबळे, अनुराधा पाटील, भाग्यश्री पाटील, अनिल पाटील, शोभा देसाई,
कागल- केराबाई आवळे, कल्पना कांबळे, सुप्रिया कांबळे, विद्या बोभाटे, मयुरी डोंगळे, पूजा मोरे, शितल फराकटे, जयश्री पाटील, सुजाता पाटील, शोभाताई फराकटे, विकासराव पाटील, नारायण ढोले, मारुती पाटील, सुप्रिया भोसले, मंगल तुकान, वंदना मुसळे, शिल्पा खोत, केरबा आवळे, प्रगती कांबळे, रूपाली कांबळे, धीरजकुमार कांबळे, प्रवीणकुमार कर्णिक, विजय दाभाडे, बळवंत माने, मंगल डोंगळे, पूजा मोरे, प्रदीप पाटील, सागर सावर्डेकर, संजय पाटील, इंद्रजीत पाटील, शंकर जाधव, जयदीप पवार, प्रियंका आवळेकर.
यावेळी माजी आमदार संपतबापू पवार- पाटील यांचे चिरंजीव क्रांतिसिंह पाटील, केरबा भाऊ पाटील, अशोक पाटील यांचा मुलगा, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर इत्यादी शेकाप पक्षाची प्रमुख मंडळीही मुलाखतीसाठी उपस्थित होते.
