कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वुभमीवर प्रभाग क्र 20 मध्ये साळोखेनगर, दादू चौगुलेनगर, तुळजा भवानी कॉलनी, सुर्वेनगर येथे काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा आणि बैठका आ . सतेज पाटील यांनी घेतल्या.
यावेळी काँग्रेसचे उमेदवार धीरज पाटील, मयुरी इंद्रजीत बोंद्रे, उत्कर्षा शिंदे, जयश्री कांबळे, राजू दिंडोर्ले, इंद्रजीत बोंद्रे यांच्यासह माजी नगरसेवक अमोल माने यांच्यासह राजेंद्र पत्की, अमर सरनाईक, बाळासाहेब कुलकर्णी, उदय साळुंखे, पांडुरंग पाटील, प्रकाश भोपळे, युवराज तेली, सुनिल वर्मा, आप्पासाहेब साळोखे तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.
यावेळी आ.सतेज पाटील म्हणाले सत्ताधाऱ्यांनी फक्त आश्वासन देऊन दावे केले आणि मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष. मी थेट पाईपलाईन प्रकल्पाद्वारे पाणी आणले कोल्हापूरचा पाणीप्रश्न सोडवला मात्र प्रशासकाकडून चालवलेली शहरातील वितरण व्यवस्था अपयशी ठरली. आपल्या प्रभागामध्ये सक्षम नगरसेवक असल्याशिवाय प्रशासनाला शिस्त लागणार नाही. शहरातील सर्व विकासकामांना गती देण्यासाठी आणि महापालिकेत सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी नागरिकांना केले.
