माझं दायित्व कोल्हापूरच्या जनतेशी, जनतेला अपेक्षित कोल्हापूर घडवणार : आ. सतेज पाटील

कोल्हापूर :प्रभाग क्रमांक 19 मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी हनुमान नगर, म्हाडा कॉलनी, जरगनगर या येथे कॉर्नर सभा आणि जनसंवाद बैठकी घेऊन सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आ.सतेज पाटील यांनीकेले.

यावेळी मधुकर रामाणे, दुर्वास कदम, शुभांगी पोवार, डॉ. सुषमा जरग यांच्यासह अनिल शिंदे, मदन कोथळकर, रवि गावडे, पप्पु गावडे, पप्पु मणेर, सुमित बामणे, जितेंद्र पाटील, दत्ता बामणे, अमित सासने, यासीन पैलवान, सुरेश चौगले, संजय कारेकर तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.

यावेळी आ.सतेज पाटील म्हणाले कोल्हापुरातल्या जनतेला विश्वासात घेऊन महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहोत. माझं दायित्व कोल्हापूरच्या जनतेशी असून जनतेच्या सूचनांतून कोल्हापूरचा चेहरा- मोहरा बदलणार आहे. “कोल्हापूर कस्सं ? तुम्ही म्हणशीला तस्सं होणार असल्याचा विश्वास त्यांना दिला.

 

🤙 8080365706