कोल्हापूर:राधानगरी तालुक्यातील फेजिवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते अतिशय उत्साहात पार पडला.
या अंतर्गत एकूण २ कोटी ४७ लाख रुपये निधीतून लिंगोबा देवालय खुल्या सभागृहाचे पूर्ण काम, ग्रामपंचायत इमारत बांधकाम, मरगुबाई देवालय पुजारी घर रस्ता, लोंढेवाडी नदीघाट बांधकाम, मुस्लिम समाज दफनभूमी संरक्षण कठडा बांधणे (पाटबंधारे विभाग) तसेच फेजीवडे मुस्लिम वस्तीमधील रस्ते आदी विविध विकासकामांचा समावेश आहे.
या कामांमुळे नागरिकांच्या सोयीसुविधांमध्ये निश्चितच भर पडणार असून गावातील मूलभूत सुविधा, धार्मिक स्थळे, रस्ते व संरक्षणात्मक कामांना गती मिळणार आहे.
याप्रसंगी अनेक मान्यवर, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
