कोल्हापूर: इचलकरंजी महानगरपालिकेची आगामी निवडणूक ‘महायुती’ म्हणून एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिवसेना नेते पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत विजयाचा निर्धार करण्यात आला. इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सज्ज आहे असा निर्धार करण्यात आला.
