कोल्हापूर प्रतिनिधी विक्रम केंजळेकर
:आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, पेठ वडगाव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे खासदार क्रीडा महोत्सव २०२५ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी एकूण ११ मैदानी क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. युवा शक्तीच्या उत्सवाच्या रूपात ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवाला विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महोत्सवात फिट इंडिया आणि खेलो इंडिया उपक्रमांच्या धर्तीवर अॅथलेटिक्स, बेसबॉल, हँडबॉल, शूटिंग, फेन्सिंग, नेटबॉल, रोलबॉल आणि बॅडमिंटन अशा विविध मैदानी खेळांचा समावेश होता. स्पर्धांदरम्यान खेळाडूंनी खेळाडूवृत्ती, संघभावना आणि क्रीडाशिस्तीचे उत्कृष्ट दर्शन घडले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. सिद्धार्थ शिंदे सर (राज्यपाल नियुक्त मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), मा. सौ. प्रवीता सालपे (माजी उपनगराध्यक्षा, वडगाव नगरपरिषद), संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. एस. घुगरे, संस्थेच्या सचिवा तथा मुख्याध्यापिका एम. डी. घुगरे, सुकुमार पाटील (माजी उपनगराध्यक्ष), धनंजय महाडिक (युवा नेतृत्व), जयेश धायगुडे (उपाध्यक्ष – युवा मोर्चा), भूषण कोरेकर (उपाध्यक्ष – युवा मोर्चा) आणि निरंजन धायगुडे (युवा नेतृत्व) मुख्याध्यापक व्ही. एस. डोईजड , पर्यवेक्षक एस,जी, जाधव.यांची उपस्थिती लाभली.
याशिवाय संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
