कोल्हापूर: पेठवडगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनि.कॉलेज आणि दिशा इंग्लिश मेडियम स्कूल या प्रशालेच्या सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 या सात दिवसात शिवचरित्र पारायणाचा एक अनोखा विश्वविक्रम केला.एकाचवेळी पंधराशेपेक्षा अधिक लोकांनी शिवचरित्राचे पारायण करण्याचा विश्वविक्रम यावेळी प्रथमच नोंदविला गेला.
या विश्वविक्रमी शिवचरित्र पारायण सोहळ्याची सांगता पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.विनयरावजी कोरे (सावकर) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माने यांनी आपल्या स्वागत व प्रास्ताविकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शवत अशा चारित्र्याचा ठसा विद्यार्थ्याच्या मनावर बिंबवणे व पुढील पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव जागृती निर्माण करुन लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीला चालना देणे या मुख्य उद्देशाने आयोजित या पारायण सोहळ्यातून शिव विचारांचा एक चांगला शिवसंस्कार विद्यार्थ्यांवर झालेला दिसून येत असल्याचे सांगितले.तसेच या पारायण सोहळ्याच्या दरम्यान शुभेच्छा देण्यासाठी आमदार अशोकराव माने,आमदार राहुल आवाडे,शिक्षक आमदार जयंत आसगांवकर,वारणा सहकारी बँकेचे चेअरमन निपुणराव कोरे ,नूतन क्लास वन अधिकारी अजय तोडकर,प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर,गटशिक्षणाधिकारी संदीप यादव,शिक्षक नेते दादासाहेब लाड, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार,कोजिमाशी पतसंस्थेचे चेअरमन दीपक पाटील,श्रीराम उद्योग समूह चावरेचे संस्थापक बी. जी.बोराडे,क्रीडा विभागाचे उपसंचालक सुहास पाटील,जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस,एन.सी.सी.अधिकारी सुभेदार दुर्गेश कुमार,वारणा बँकेचे संचालक
प्रभाकर कुरणे,बाबासो बावडे,प्रकाश माने,संचालिका महानंदा घुगरे,
माजी जि.प.सदस्य राजवर्धन मोहिते,संजीवनी पब्लिक स्कूलचे संस्थापक पी.आर.भोसले ,अंबपच्या लोकनियुक्त सरपंच दीप्ती माने अशा सामाजिक,शैक्षणिक,राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट दिल्याचे सांगितले.
या विश्वविक्रमासाठी ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड व एशियन पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्डचे निरीक्षक प्रा.डॉ.महेश कदम यांनी सलग सात दिवस सकाळच्या सत्रात पूर्ण वेळ उपस्थित राहून प्रशालेतील शिवचरित्र पारायण सोहळ्याचे निरीक्षण करून नोंद घेतली व शिवचरित्र ग्रंथाच्या एकूण 502 पानांचे वाचन केले गेल्याचे तसेच या पारायणासाठी एकूण 1503 जणांचा सहभाग नोंद झाल्याचे जाहीर केले.
आमदार विनयरावजी कोरे व निरीक्षक प्रा.महेश कदम यांच्या हस्ते मुख्याध्यापक राजेंद्र माने यांना विश्वरेकॉर्ड यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर,के.डी.सी.सी.बँक संचालक विजयसिंह माने,महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष व शिक्षक नेते खंडेराव जगदाळे,माजी जि.प.कोल्हापूर सदस्य प्रवीण यादव,हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. प्रदीप पाटील,वारणा बँकेचे व्हा.चेअरमन उत्तम पाटील,वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील,तसेच हातकणंगले परिसरातील विविध शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.डी.एस.घुगरे,आण्णासाहेब पाटील,शिवलिंग कळंत्रे,उत्तम पाटील,ए.बी. पाटील,एम. ए. परीट,अमोलकुमार पाटील,महिला तक्रार निवारण समिती,महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा श्रुती पुंगावकर,संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप दरवान,सचिवा सुवर्णा माने, खजानीस बापूसो माने,संचालक अविनाश दरवान,कुमार दरवान,मॉडर्न विद्यानिकेतन आळतेचे मुख्याध्यापक सचिन चौगुले,मिलिटरी इन्स्ट्रक्टर मेजर राजेंद्र पाटील,कॅप्टन सुरेश अडसूळ तसेच सर्व विभागप्रमुख,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.जे.सासणे व एम.पी.यादव यांनी केले व वनिता पाटील यांनी आभार मानले.
