कुंभोज येथील विक्रम सिंह तरुण मंडळांनी यावर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीत वारकरी संप्रदाय दिंडी द्वारे आणि स्वामी समर्थांच्या दर्शनाचे आयोजन केले होते

कुंभोज (प्रतिनिधी) – कुंभोज येथील विक्रम सिंह तरुण मंडळाने यावर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीत एक आगळीवेगळी आणि भक्तिभावाने नटलेली परंपरा जपली. मंडळाने आपल्या गणरायाला निरोप देताना पारंपरिक वारकरी संप्रदायाच्या दिंडीद्वारे मिरवणूक काढली आणि त्यात स्वामी समर्थांच्या दर्शनाचेही आयोजन केले होते.

गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात व टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेली ही दिंडी संपूर्ण कुंभोज नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण करून गेली. वारकरी मंडळींचा टाळांचा गजर, अभंगगायन आणि पांडुरंगाच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले होते. पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिरसात न्हालेली मंडळी हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.

मंडळाच्या या उपक्रमात विशेष आकर्षण ठरले ते स्वामी समर्थ महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचे आयोजन. स्वामी समर्थांची भव्य जीवत मूर्ती आणि भक्तांच्या श्रद्धेने सजलेले रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. भक्तांनी नम्रतेने दर्शन घेतले आणि पुढील वर्षी लवकर या आशेने गणरायाला निरोप दिला.

विक्रम सिंह तरुण मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक आणि धार्मिक परंपरेचा संगम साधत समाजात एक सकारात्मक संदेश दिला आहे. मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले. या भक्तिरसपूर्ण आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध विसर्जन मिरवणुकीची चर्चा सध्या संपूर्ण कुंभोजमध्ये होत आहे.विनोद‌ शिंगे कुंभोज

🤙 9921334545