कोल्हापूर :-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ‘क्यूएस आय-गेज’ (QS I-GAUGE) डायमंड श्रेणी प्राप्त झाली असून हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात तेलंगणाचे राज्यपाल जिष्नू देव वर्मा यांच्या हस्ते विद्यापीठाला या मानांकनने सन्मानित करण्यात आले. हे मानांकन विद्यापीठासाठी अभिमानास्पद क्षण असून विद्यापीठाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असल्याचे प्रतिपादन कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केले.
हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात तेलंगणाचे राज्यपाल जिष्नू देव वर्मा यांच्याहस्ते कुलपती डॉ. संजय डी पाटील यांच्यावतीने डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि आय. क्यू. ए. सी. संचालक डॉ. शिंपा शर्मा यांनी हे मानांकन प्रमाणपत्र स्वीकारले.
विद्यापीठाला मिळालेले डायमंड रेटिंग सर्वच विभागामध्ये विद्यापीठाची गुणवत्ता सिद्ध करत आहे. या मूल्यांकनात अध्यापन आणि शिक्षण, सामाजिक जबाबदारी, शासन व्यवस्था आणि रचना या तीन विभागामध्ये विद्यापीठाला सर्वोत्तम कामगिरीसाठी प्लॅटीनम तर प्राध्यापक गुणवत्ता, रोजगारयोग्यता आणि सुविधा या विभागांमध्ये डायमंड मानांकन मिळाले आहे.
कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि आय. क्यू. ए. सी. संचालक डॉ. शिंपा शर्मा यांनी कुलपती डॉ. संजय डी.पाटील यांच्याकडे हे प्रमाणपत्र सादर केले. या यशाबद्दल डॉ. पाटील यांनी अतिशय समाधान व्यक्त केले.
कुलपती डॉ.संजय डी. पाटील म्हणाले, “या मान्यतेमुळे विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांच्या मेहनतीचे हे यश असून याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपकुलसचिव संजय जाधव यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर- ‘क्यूएस आय-गेज’ प्रमाणपत्र सोबत डॉ. संजय डी. पाटील. डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. शिंपा शर्मा, डॉ. व्ही. व्ही. भोसले आदी.