कोल्हापूर दि.२६ : काही चांगल होत असेल तर त्यात खोड घालायची प्रवृत्ती काही लोकांची आहे. त्यामुळे दुधात पडलेला मिठाचा खडा शेतकरी बांधवांनीच बाजूला करून राजू शेट्टी यांना सलग दुसऱ्यांदा घरी बसविले. दातृत्व काय असते हे मला राजू शेट्टी यांच्यासारख्या दलबदलू व्यक्तीकडून शिकण्याची गरज नाही. आई अंबाबाई चरणी मी माझे जीवन दान करेन. पण, निव्वळ स्टंटबाजीसाठी दातृत्वाची भाषा करणारे राजू शेट्टी कोरोना आणि महापूर काळात कोणत्या बिळात लपले होते, हे जनतेने पाहिले आहे. त्याचमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी आपली अनामत रक्कमही वाचवू शकले नाहीत. याचे आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा खोचक टोला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, राजकारणाला आणि आंदोलनाला काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा आम्हाला शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिकविल्या आहेत. त्यामुळे आजही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सुत्रानेच काम करत आहे. त्याचे फळही जनतेने या निवडणुकीत दाखवून दिले. महाभयंकर कोरोना आणि दोन्ही महापुराच्या गंभीर परिस्थितीवेळी रस्त्यावर उतरून लोकांची सेवा केली आहे. कोल्हापुरातील जनता हेच माझ कुटुंब समजून भाजी-पाला, धान्य अशा जीवनावश्यक वस्तू पुरविल्या. पूरस्थितीत स्वत: पाण्यात उतरून बचाव कार्यात सहभागी झालो. देव धर्मासाठी, जनतेसाठी मी काय दान केले आहे, हे वेळोवेळी प्रसिद्धीमाध्यमातून प्रसिद्ध झाले आहे. या कामाचे मोल समजण्याएवढी राजू शेट्टी यांची बुद्धिमत्ता नाही. कारण, त्यांच्यासारख्या दलबदलू व्यक्तीने ज्या शेतकरी बांधवांच्या जीवावर सत्ता भोगली त्यांनाच बाजूला करत सद्या कारखानदारांशी युती केली आहे.
*वास्तविक पाहता शेतकरी बांधव कर्जबाजारी होत असताना उसाला चांगला भाव मिळावा म्हणून शेतकरी बांधवांनी केलेल्या आंदोलनात राजू शेट्टी उदयाला आले. ऊसाला मिळालेला ६०० रुपयांचा दर ३००० रुपये झाला हा शेतकरी बांधवांची एकजूटीचा विजय होता मात्र श्रेय राजू शेट्टी यांनी घेतले. त्यातूनच लॉटरी लागून ते खासदार झाले. पण, आता शेतकरी बांधवांना बाजूला करून राजू शेट्टी ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत त्यांची सावलीही राजू शेट्टी यांच्यावर पडल्याने “खोट बोल पण रेटून बोल” अशी त्यांची वृत्ती बनली आहे.*
वास्तविक त्यांनी आरोप केलेले वडिलांच्या वैद्यकीय बिलाचे खोटे आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. ते आरोप त्यांनी सिद्ध करावेत मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास घ्यायला तयार आहे परंतु आरोप सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांनीही त्यांच्या राजकीय जीवनाचा संन्यास घ्यावा. राजू शेट्टी यांनी तोंडघशी पडण्यापेक्षा विषयाला बगल देवून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी त्यांनी निव्वळ स्टंटबाजी सुरु केली आहे, हे जाणण्याएवढी जनता दुधखुळी नाही आहे. जनतेने त्यांना योग्य जागा दाखविली असून, दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा त्यांनी शेतकरी बांधवांचे प्रश्न मार्गी लावले असते तर कदाचित ते निवडणुकीतील “डिपॉझीट” वाचवू शकले असते.
*गोकुळ दूध संघाच्या विरोधात दूध खरेदी बाबतीत मोठे आंदोलन केले दूध रस्त्यावर ओतले व त्यासाठी आपले स्वतंत्र दूध संघ स्थापन केले तर त्या दूध संघामध्ये शेतकऱ्यांना खरेदी दर किती दिला जातो. साखर कारखानदाराविरुद्ध आंदोलन केलं साखरेला दर चांगला यावा म्हणून आपण स्वतः का साखर कारखाना चालवत नाही आणि एक आदर्श कारखानदार म्हणून शेतकऱ्यांना हायेस्ट FRP देवू शकत नाहीत काय? शरद जोशी साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून राजू शेट्टी यांनी अस्तित्व निर्माण केले खरे शरद जोशी साहेब हेच एफ आर पी चे जनक आहेत. सांगलीचे भूसंपादन झाले त्यावेळी राजू शेट्टीनी त्यांच्याच माणसांना पाठवून मोबदला घ्यायला लावला मग कोल्हापूरचेच राजू शेट्टी यांना वावडे का आहे, हेही त्यांनी जाहीर करावे. बाकीचे सर्व जाउ देत नुसतेच उठून जनतेसमोर आपली टिमकी वाजवायची हि त्यांची वृत्ती बनली आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांना आंदोलने करावीच लागतील त्याशिवाय त्यांचे दुकान चालू राहणार नाही, असा खोचक टोला आमदार राजेश क्षीरसागर यांनी लगावला.*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार राज्याच्या विकासाचे पाऊल टाकत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या गेल्या साडे तीन वर्षांच्या काळात माझ्या मागणीनुसार कोल्हापूर जिल्ह्याला कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. यातून बरीच विकास कामे पूर्णत्वास येताना दिसत आहेत. याउलट प्रसिद्धीपोटी नुसतेच आरोप करणाऱ्यांची कर्तव्यशून्य कारकीर्द तपासून पहावी. त्याचमुळे तर त्यांना जनतेनेच नाकारले आहे. त्यामुळे या त्यांना आता बिनबुडाच्या टीका करण्याखेरीज कोणतेही काम शिल्लक राहिले नसल्यानेच वैफल्यग्रस्त होवून प्रसिद्धी पोटी खोटे आरोप करत आहेत. त्यांनी केलेल्या आरोपाकडे फालतू वेळ वाया घालविण्यापेक्षा पेक्षा मी माझे जनहिताचे समाजकार्य आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचे कार्य करण्यास वेळ खर्ची घालेन. त्यांनी जरूर आई अंबाबाईचे दर्शन घ्यावे आणि स्वत: साठी थोडी सुबुद्धीही मागावी, असा उपहासात्मक टोलाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी लगावला.