डी. वाय. पाटील अभियांत्रिकी मेकॅनिकलच्या 55 विद्यार्थ्याना प्लेसमेंट

कसबा बावडा:- येथील डी. वाय .पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना ६ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज ऑफर करण्यात आले आहे.

महाविद्यालयात आयोजित विविध कंपनीच्या प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे हि निवड करण्यात आली. यामध्ये भारत फोर्ज, क्रिमसन एनर्जी, डीयाजिओ इंडिया, डायलॉग मीडिया, फोर्स मोटर्स, किर्लोस्कर ब्रदर्स , घाडगे – पाटील इंडस्ट्रीज, इंडोवन्स, जे. एन.के., मेनन अँड मेनन, क्यूस्पायडर, थॉमस अँड ब्रेन, विप्रोपारी, मेनन बेअरिंग, वरली यांसारख्या नामांकित आणि प्रतिष्ठित कंपन्यांनी सहभाग घेतला. या कंपन्यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे आणि महाविद्यालयाच्या प्रशिक्षण प्रक्रियेचे कौतुक केले. काही विद्यार्थ्यांना भारताबाहेरील प्रोजेक्ट्ससाठी देखील संधी प्राप्त झाली आहे.

विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटसाठी डिपार्टमेंटतर्फे अभ्यासक्रमाबरोबरच वैयक्तिक मार्गदर्शन व्यक्तिमत्व विकास आणि प्रशिक्षण त्याशिवाय विविध कार्यशाळा डिपार्टमेंटतर्फे सतत आयोजित केल्या जात होत्या. औद्योगिक गरजांनुसार प्रशिक्षित करून तांत्रिक आणि मुलाखतीच्या तयारीसाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय संभाषण कौशल्य, नेतृत्व गुण यासाठी विविध कार्यशाळा सुद्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आल्या होत्या. यामुळे विद्यार्थ्यांना प्लेसमेंट साठी मोठ्या प्रमाणात मदत झाली.

या निवडीसाठी अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, विभाग प्रमुख डॉ. सुनील रायकर, प्लेसमेंट समन्वयक प्रा. विराज पसारे, प्रा. उत्कर्ष पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल.व्ही. मालदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

🤙 9921334545