कोल्हापूर : भैरेववाडी येथे २ कोटींच्या निधीतून सांस्कृतिक हॉलच्या स्लॅब कामाचा शुभारंभ करण्यात आला.
माझ्या राजकीय व सामाजिक प्रवासात मराठा समाजाने नेहमीच साथ दिली आहे,ते मी कधीही विसरणार नाही,समाजातील तरुणांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे.शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे साधन आहे. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो असून,यापुढेही कटिबद्ध राहीन,असे प्रतिपादन आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
कुरुंदवाड शहरातील भैरेववाडी येथे मराठा समाजासाठी उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक हॉल व अभ्यासिकेसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.या हॉलच्या स्लॅब कामाचा शुभारंभ आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाला.
शहरात विविध समाज घटकांच्या प्रगतीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्यात आला आहे.शिवतीर्थ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरणासाठी,मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक भवन, शिकलगार समाज सांस्कृतिक भवन यासह इतर समाज घटकांना भरीव विकास निधी दिला आहे.त्यामुळे कुरुंदवाड शहरात विकासाचे पर्व सुरू आहे.कोणताही समाज विकासाच्या प्रवाहापासून वंचित राहू नये,यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत आहे.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे,रमेश भुजुगडे,महिपती बाबर,रामभाऊ मोहिते,रामचंद्र रोहिते, राजू घारे,सुनील चव्हाण,वैभव उगळे, दिपक गायकवाड,पांडुरंग मोहिते, विजय भोसले,दादासो पाटील,जवाहर पाटील,चंद्रकांत जोंग,अक्षय आलासे, उमेश कर्नाळे,राजू आवळे,बाबासो सावगावे,तानाजी आलासे,रणजित डांगे,राजू बेले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.