कोल्हापूर :
जगातील आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीमध्ये आयटी क्षेत्राचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. कोल्हापुरात कौशल्यवान मनुष्यबळ आणि भौगोलिकदृष्ट्या चांगले स्थान असल्याने येथे एक प्रमुख आयटी हब निर्माण होऊ शकते. आयटी पार्कमुळे कोल्हापूरच्या तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्यास मदत होईल आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. या विषयात आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या नाम. ॲड. आशिष शेलार यांना आयटी प्रश्नाच्या जागे संदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी निवेदन सादर केले.
कोल्हापुरात आयटी पार्क उभारण्यासाठी प्रशासकीय बैठकाही पार पडलेल्या आहेत. सद्यस्थितीत शेंडापार्कमधील ३५.७१ हेक्टर जमीन आयटी पार्कसाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. सदरील जागा ही कृषि खात्याच्या ताब्यात असून त्यांना त्याबदल्यात इतर ठिकाणी जागा देण्याचे ठरले आहे. तरी कृषि खात्याकडून जमिनीचे हस्तांतरण करावी, जेणेकरून आयटी पार्क होण्यासाठी मार्ग मोकळा होईल.
कोल्हापूर जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक विकासाचा सकारात्मक परिणामांचा विचार करता, तात्काळ संबंधित खात्याच्या प्रमुखांची लवकरात लवकर बैठक मुंबईत घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी य निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन स्वीकारल्यानंतर कोल्हापूरच्या आयटी आयटी पार्कच्या संदर्भात परवानगी विषयात असणाऱ्या सर्व खात्यांची बैठक लवकरात लवकर बोलवली जाईल अशा आश्वासन दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, विजय सूर्यवंशी, राजसिंह शेळके, शेखर कुसाळे, ललीत गांधी, आशिष ढवळे उपस्थित होते.