शक्तीपीठ महामार्गा विरोधातील शेतकऱ्याची ऑनलाईन राज्यव्यापी बैठक

कोल्हापूर : नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज गुरुवारी 26/06/25 रोजी सायंकाळी  राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात येणार आहे.

 

12 जिल्ह्यातील बाधीत शेतकरी या बैठकीत सहभागी होणार असून आहेत. या ऑनलाईन बैठकीमध्ये आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी, खासदार विशाल पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, खासदार नागेश पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, आमदार दिलीप सोपल, आमदार चंद्रकांत नवघरे, आमदार प्रविण स्वामी, उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर आदी सहभागी होणार आहेत.

🤙 9921334545