जनतेच्या पाठबळावर विधानसभेला चांगली मजल; कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेसाठी सज्ज रहावे राजे समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर सांगाव, :-“तालुक्यातील तीन गट विरोधात असतानाही विधानसभेची निवडणूक ताकदीने लढलो. मोठे नेते एका बाजूला होते,तरीही स्वाभिमानी जनतेने आमच्यावर विश्वास टाकला. तब्बल एक लाख तेहतीस हजार मतांनी आशीर्वाद दिला. आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे,” असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

मौजे सांगाव येथे बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या वेळी अध्यक्षस्थानी शाहू ग्रुपचे संचालक युवराज पाटील होते.

घाटगे पुढे म्हणाले, “निवडणुकीत विजय-पराजय येत असतो. मात्र निकालानंतरही जनतेचा प्रतिसाद कायम आहे, हेच आमचे खरे यश आहे.जनतेचा पाठिंबा आमच्या सोबत आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांत पुन्हा एकदा जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे.”

याप्रसंगी शाहूचे संचालक युवराज पाटील,राष्ट्रवादीचे तालुकाध्याक्ष शिवानंद माळी, राजे बँकेचे संचालक अमोल शिवई, यांनीही मनोगत व्यक्त केले.

व्यासपीठावर शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,संचालक सचिन मगदूम,प्रताप पाटील,राजेंद्र माळी,कैलास जाधव,मिलींद पाटील,बाबासो मगदूम,सुधाकर सुळकुडे,निवास पाटील,संजय पाटील,गजाननराव निंबाळकर,अनिल हेगडे आदी उपस्थित होते.
अमर शिंदे यिंनी स्वागत केले.संदीप क्षीरसागर यांनी आभार मानले.

छायाचित्र मौजे सांगाव येथे बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व्यासपीठावर कृष्णात पाटील,युवराज पाटील,अमरसिंह घोरपडे,शिवानंद माळी व इत्तर

घाटगे म्हणाले, “कृष्णात पाटील हे अत्यंत कार्यक्षम व कर्तबगार नेतृत्व आहे. त्यांच्या कार्यक्षमतेप्रमाणे त्यांना न्याय मिळाला नाही. तो आपण मिळवून देऊ.”
हे वक्तव्य होताच उपस्थित पाटील समर्थकांनी “जिल्हा परिषदेसाठी पाटील यांना उमेदवारी द्या” अशा घोषणा देत परिसर दणाणून टाकला.यावर घाटगे म्हणाले, “आज बोलण्यासारखे खूप आहे, पण सध्या शांत राहतो. जे तुमच्या मनात आहे, तेच माझ्या मनात आहे.”
या सूचक वक्तव्यानंतर वातावरण उत्साही आणि जल्लोषमय झाले.

🤙 9921334545