कुंभोज (विनोद शिंगे)
मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले सरकार यांच्याशी हातकणंगले विधानसभेमधील विविध कामासंदर्भात हातकणंगले तालुक्याचे आमदार दलित मित्र अशोकराव माने व भाजपा वडगाव मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी चर्चा केली यावेळी मंत्री महोदयांनी हातकणंगले विधान सभा मतदार संघातील कामाच्या बद्दल सकारात्मक चर्चा झाली.
या हातकणंगले विधानसभा मतदारसंघात पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेक रस्ते खराब झाले असून सदर रस्त्यांची तात्काळ पंचनामे करून ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही याही मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. यावेळी मंत्री महोदयांचा सत्कार हातकणंगले तालुका भाजपचे अध्यक्ष अमरसिंह पाटील ,आमदार अशोकरावजी माने सुहास राजमाने यांच्या हस्ते करण्यात आला.