कोल्हापूर : जिवाजी बँक, इचलकरंजी परिसरातील रस्त्यावर सातत्याने पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्येबाबत नागरिकांनी आमदार राहुल आवाडे यांना निवेदन दिले.
या निवेदनाची त्वरित दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना पाईपलाइन तात्काळ बदलण्याचे आदेश दिले आणि काम सुरू करण्यास सांगितले. तसेच त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली व नागरिकांना दिलासा दिला.