कोल्हापूर : कुरुंदवाड आगार,नृसिंहवाडी येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक बीएस-६ मानांकन प्राप्त ०५ नवीन बसेस दाखल झालेल्या आहेत.त्याच्या उदघाटन सोहळ्या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहून उपस्थित प्रवाशांना सदिच्छा दिल्या.या बसेस आता कुरुंदवाड आगारातून प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज आहेत.
कुरुंदवाड आणि परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवास अनुभवता यावा,यासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.या नवीन बसेस प्रदूषण नियंत्रणासोबतच इंधन कार्यक्षमतेतही उल्लेखनीय आहेत,त्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर आणि सोयीस्कर ठरेल.
या प्रसंगी आगार व्यवस्थापक व कर्मचारी तसेच कुरुंदवाड परिसरातील प्रवाशी उपस्थित होते.