मुंबई : दूधगंगा डाव्या कालव्यामधून मौजे व्हन्नूर (ता.कागल) येथील तलावात पाणी सोडण्याबाबत मंत्रालयात सकारात्मक बैठक.
आज मंत्रालयात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत जलसंपदा मंत्री मा.ना. डॉ.राधाकृष्ण विखे-पाटील व समवेत दूधगंगा डाव्या कालव्यामधून मौजे व्हन्नूर (ता.कागल) येथील तलावात पाणी सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा पार पडली.
गावाच्या शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तलावात पाणी सोडण्याच्या मागणीवर विचार करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
याकरिता २३ लाख रुपये निधीची तरतूद करता आली याचा मला अभिमान आहे. असे मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.