भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ हातकणंगलेत शिवसेनेची तिरंगा रॅली

हातकणंगले (विनोद शिंगे):-
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय शस्त्रदलाच्या सन्मानार्थ शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने हातकणंगले ते शिरोली तिरंगा तिरंगा रॅलीचे नियोजन करण्यात आले होते.

 

हातात राष्ट्रध्वज घेऊन व रॅली समोर देशभक्तीपर गीते लावून भारत माता की जय घोषाने हातकणंगले येथील शिवसेना कार्यालयापासून सुरू झालेली रॅली अतिग्रे, चोकाक, रुकडी, हेरले, हालोंडी करत शिरोली येथे रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी बोलताना माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने जशास तसे उत्तर देत पाकची कुटील मनसुबे धुळीस मिळवले. भारतीय जवानांचे देशाप्रती असणारे योगदान अतुलनीय असून या जवानांचे मनोबल वाढवणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच तालुकाप्रमुख अजित सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान रॅलीस शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी शिवसैनिक, युवासैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार जिल्हा उपप्रमुख अविनाश बनगे यांनी मानले.विनोद शिंगे कुंभोज

🤙 9921334545