कदमवाडीतील ग्रामदैवत लोळजाई देवी मंदिराचे लोकार्पण

म्हालसवडे / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील तेरसवाडी पैकी कदमवाडी येथील ग्रामदैवत लोळजाई देवी मंदिराचा कळसरोहन व मंदिर लोकार्पण सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांच्या हस्ते कळस रोहन सोहळा शुक्रवारी सकाळी पार पडला. तर खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.

लोळजाई देवी देवस्थान समितीच्या वतीने मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तेरसवाडी, कदमवाडी, भोगमवाडी व मल्लेवाडी येथील विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

खासदार शाहू छत्रपती यावेळी बोलताना म्हणाले, लोळजाई मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे या पंचक्रोशीचा सर्वांगीण विकास होईल. येथे भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणात येतील. तसेच येथील युवकांची शैक्षणिक क्षेत्रात
चांगली प्रगती असून येथील युवकांच्यासाठी प्रशस्त क्रीडांगण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व वाचनालय सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू. येथील सर्वसामान्य शेतकरी हेच आमचे अशास्थान असून या परिसरातील डोंगर कपारीत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध राहू.

मुर्ती शास्त्राचे अभ्यासक व ज्येष्ठ इतिहास संशोधक उमाकांत राणींगा व प्रसन्न मालेकर यांनी लोळजाई देवीची ऐतिहासिक व धार्मिक माहिती सांगितली. देवस्थान कमिटीचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी स्वागत व प्रास्तावित केले. या वेळी माजी सरपंच बळवंत पाटील, बबन कदम, सचिन पाटील ( शिरोली दुमाला ), स्वरूपसिंह पवार -पाटील, डॉ. निवास वरपे, बळवंत पेंढरे, हिंदुराव पाटील, युवराज भोगम, भिकाजी जाधव, विलास वाघे, लक्ष्मण रायकर व ग्रामस्थ आणि माहेरवाशीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. आभार रवींद्र भोगम यांनी मांनले. यावेळी भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.

🤙 9921334545