महायुती सरकारकडून वचनपूर्ती, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे कोल्हापूरच्या पर्यटन आणि आर्थिक विश्वाला मिळणार बूस्टर डोस, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून महायुतीचे आभार

कोल्हापूर : दिलेला शब्द पाळणारे सरकार म्हणून, राज्यातील महायुती सरकारचा नावलौकिक आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने आज कोल्हापूरसाठी वचनपूर्ती केली आहे. श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि श्री ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी देऊन, त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे.

गेली अनेक वर्ष कोल्हापूरच्या नागरिकांकडून या दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची मागणी केली जात होती. कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय असलेल्या या मागणीला राज्यातील महायुती सरकारने मूर्त रूप देण्यासाठी पाऊल उचलले आहे. याबद्दल राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांचे कोल्हापूरच्या जनतेच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो.

 

ज्या पद्धतीने केंद्रातील मोदी सरकारने पुढाकार घेऊन , वाराणसी आणि अयोध्या तीर्थक्षेत्राचा विकास केला, त्यातून लाखो पर्यटक आणि भाविक त्या ठिकाणी जाऊ लागले. त्यातून त्या तीर्थक्षेत्रांचा पूर्ण कायापालट होऊन अनेक घटकांना आर्थिक चालना मिळाली. त्याच पद्धतीने श्री अंबाबाई आणि श्री जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीतून, कोल्हापूरच्या पर्यटन विकासालाआणि पर्यायाने विविध घटकांच्या आर्थिक उन्नतीला गती मिळेल, याचा विश्वास वाटतो. समस्त कोल्हापूरकरांच्या दृष्टीने राज्य सरकारने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आणि समाधानकारक आहे

🤙 9921334545